HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

मुंबई | अखेर महाविकासआघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला. येत्या २४ डिसेंबरला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शिवसेना १० खाती राष्ट्रवादी काँग्रेस ११ खाती आणि काँग्रेस ८ खाती, असा मंत्रिमंडळाच्या विस्तारात होणार असून याच दिवशी हे सर्व मंत्री शपथ घेणार आहे. तर कोणत्या नेत्याला कोणते खाते मिळणार याकडेची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकररे यांच्यासोबत सहा मंत्र्यांनी शपथ घेतली होती. हे सहा मंत्री सध्या नागपूरचे अधिवेशन संपेपर्यंत काम राज्याचे काम पाहत आहेत. नागपूरचे अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे येत्या २४ डिसेंबरला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. हिवाळी अधिवेशनाचा उद्या (२१ डिसेंबर) संपत आहे तर २२ डिसेंबरलासुट्टी आहे आणि २३ डिसेंबरला मंत्रिमंडळावर चर्चा होणार असून मंगळवारी (२४ डिसेंबर) मंत्री मंडळाचा विस्तार होऊन मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणा दाम्पत्यांच्या चहा पितानाच्या व्हिडीओवर त्यांच्या वकिलांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Aprna

‘वंचित बहुजन आघाडी’च्या दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

‘केंद्रसरकारकडून महाराष्ट्राला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागतायत’ – नवाब मलिक

News Desk