HW News Marathi
महाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील विकास कामाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा मुंडे बहीण भावात जुंपली!

बीड | बीड जिल्ह्यात नव्याने चार रस्त्यांसाठी ७६८ कोटीची ही निविदा पाठवली असून लवकरच महामार्गाच्या कामांना सुरवात होणार आहे. मात्र, याच कामाचे श्रेय नेमके कोणाचे या मुद्यांवरून मुंडे बहीण-भावात पुन्हा नवा वाद समोर उपस्थित होताना दिसून येत आहे.

परळी – सिरसाळासह चार रस्त्यांसाठी ७६८ कोटीची ही निविदा असून लवकरच महामार्गाच्या कामांना सुरवात होणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गामुळे जिल्हयाच्या विकासात मोठी भर पडणार आहे, असं सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे त्यांच्या ट्विटरवरून आभार मानले. तर विद्यमान पालक मंत्री यांनी गेल्या १० वर्षापासून परळी नगर पालिका स्वतःच्या ताब्यात असताना ही भुयारी गटार योजनाच्या कामाचे तीन तेरा केले, त्यांनी आम्ही केंद्रातून रस्त्यांच्या कामाची मंजुरी आणली असे फुकटचे श्रेय घेऊ नये, असा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केला आहे.

राष्ट्रवादीचाही पलटवार 

तर परळी-धर्मापुरी-पानगाव, परळी ते सिरसाळा मार्गे बीड पर्यंत आदी राष्ट्रीय महामार्गांचा विस्तार करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नितीन गडकरींकडे लेखी स्वरूपात मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्याचेच फलस्वरूप बीड जिल्ह्यातील परळी ते सिरसाळा मार्गे बीड पर्यंत व जिल्ह्यातील अन्य महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गांच्या विस्तार करण्याच्या कामास यापूर्वीच मंजुरी मिळाली असून, आता त्या कामांच्या निविदा प्रसिद्ध होताच माजी पालकमंत्री या कामांचे श्रेय घेण्यासाठी आटापिटा करत असल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यांच्या स्थानिक नेत्यांर्फत केला जात आहे.

तर माजी पालकमंत्री यांना साधा अंबाजोगाई ते परळी रस्ता गेल्या ५ वर्षांच्या काळात करता आला नाही त्यांनी इतर कोणते रस्ते आणल्याचे श्रेय घेऊ नये, असा आरोपही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमार्फत पंकजा मुंडेंचे नाव न घेता केला जात आहे. यावरून बीड जिल्ह्याच्या विकास कामाच्या श्रेयावरून पुन्हा मुंडे बहीण भावात जुंपल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकार कोसळणार अशा पैजा लागल्या होत्या मात्र सरकार ताकदीने चालतयं!

News Desk

“…तर नारायण राणेंची अटक ही बेकायदेशीरच मानायला हवी”

News Desk

लॉकडाऊनवरुन राज्य सरकारमध्ये थोडेसे मतभेद असले तरी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत

News Desk