नवी दिल्ली | कर्जमाफी आणि शेतमालाच्या खर्चावर दीडपट हमीभाव या दोन प्रमुख मागण्यांना घेऊन देशभरातील हजारो शेतकरी संघटनांनी गुरुवारी(२९ नोव्हेंबर) पुन्हा दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत दाखल झालेले शेतकरी शुक्रवारी(३० नोव्हेंबर) संसदेवर मोर्चा काढणार आहेत.
Delhi: #Visuals from Ramlila Maidan on the second day of 2-day protest by farmers from all across the nation, who are asking for debt relief, better MSP for crops, among other demands pic.twitter.com/Awkh9uwIbh
— ANI (@ANI) November 30, 2018
अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व शेतकरी संघटना एकत्र आले आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारी दिल्लीत आलेला हा मोर्चा रामलीला मैदानात स्थिरावला आहे. शुक्रवारी येथून संसदेकडे मोर्चा रवाना होणार आहे. यापूर्वीही दिल्लीत शेतकर्यांनी रामलीला मैदानावर आंदोलन करून सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधले होते. मात्र, सरकारशी चर्चा करून आंदोलन स्थगित करूनही मागण्या मान्य न झाल्याने पुन्हा शेकऱ्यांनी या मोर्चाचे आयोजन केले आहे.
शेतकर्यांचा कर्जबाजारीपणा आणि आत्महत्या हा विषय शासन दरबारी मांडला जाणार आहे. शेतकर्यांच्या उत्पादनात वाढ झाल्यास त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, अशी मागणी केली आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनास भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, राष्ट्रीय किसान मजदूर संघटना, किसान एकता संघटना, भारतीय किसान युनियन अशा २०८ संघटनांचे सदस्य शेतकरी दिल्लीत दाखल होत आहेत. दिल्लीसाठी महाराष्ट्रातून ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ नावाने ३ रेल्वे आरक्षित केल्या आहेत. किमान २ लाख शेतकरी मोर्चामध्ये सामील होणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.