HW News Marathi
कृषी

GST लागू झाल्याने 1 जुलै पासून सायनिक खताच्या किंमती कमी       

उत्तम बाबळे

नांदेड :- गुडस ॲड सर्व्हिस टॅक्स (GST) लागु होण्यापूर्वी रासायनिक खतावर 1 टक्के उत्पादन शुल्क (Excise Duty) व 5 टक्के मुल्य आधारीत कर (VAT) लागू होता. दिनांक 1 जुलै 2017 पासून अनुदानीत रासायनिक खतावर सरसकट 5 टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनुदानीत रासायनिक खताच्या किंमती 1 जुलै पासून कमी झाल्या आहेत. याबाबत खत विक्रेत्यांना तसेच खत कंपनी प्रतिनिधी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सुधारीत दर साठा भाव फलकावर प्रसिद्ध करण्याबाबत कळविण्यात आले आहे,शेतक-यांनी अधिकची रक्कम देऊ नये व कोणी घेत असेल तर कृषि विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

दिनांक 1 जूलै 2017 पासून रासायनिक खताचे नवीन सुधारीत दर प्रत बॅग 50 किलोसाठी पुढील प्रमाणे आहेत.

1)10:26:26 झुआरी 1076/- रुपये, 2)10:26:26 कोरोमंडल 1044 , 3) 10:26:26 कृभको 1055 , 4)12:32:16 झुआरी 1082 , 5) 14:35:14 कोरोमंडल 1122, 6)15:15:15 आर.सी.एफ. 887, 7)

16:16:16 आय.पी.एल. 892, 8) 17:17:17 कोरोमंडल 946, 9) 24:24:00 कोरोमंडल 966, 10) एम.ओ.पी. झुआरी 579, 11) एम.ओ.पी.आय.पी.एल.580 ,12) एम.ओ.पी.कृभको 577.50,13) एम.ओ.पी. कोरोमंडल 575,14) एस.एस.पी. (जी.) झुआरी 400, 15) डी.ए.पी.आर.सी.एफ. 1076,16) डी.ए.पी.झुआरी 1105, 17) डी.ए.पी. आय.पी.एल. 1086,18)डी.ए.पी. कोरोमंडल ,19) डी.ए.पी. कृभको 1076, 20) युरीया आर.सी.एफ. 295, 21) युरीया झुआरी 295, 22)युरीया

आय.पी.एल. 295, 23) युरीया कोरोमंडल 295, 24) युरीया नागार्जूना 295, 25) युरीया कृभको 295, 26) अमोनिअम सल्फेट आय.पी.एल. 700, 27) 15:15:15:09 आय.पी.एल. 890, 28) 16:20:0:13 कोरोमंडल 821, 29) 20:20:0:13 आय.पी.एल. 865,

30) 20:20:0:13 कोरोमंडल 873, 31) 20:20:0:13 कृभको 850/-…रुपये.

किरकोळ, घाऊक खत विक्रेत्यांनी कमी झालेल्या दराबाबत ग्रेडनिहाय दर, दरफलकावर प्रदर्शित करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना नवीन दराने खताची खरेदी करावी. खरेदी पावतीवर शेतकरी व विक्रेता या दोघांच्या स्वाक्षरी घेण्यात याव्यात शेतकऱ्यांनी खताच्या दराबाबतीत असलेल्या तक्रारीसाठी प्रत्यक्ष, दुरध्वनी, ई-मेल व एस.एम.एस. द्वारे तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 व (02462) 230123 व भरारी पथकाचे फ्लेक्स वरील दुरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.

सर्व खत विक्रेत्यांना GST साठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व खत विक्रेत्यांनी GST साठी नोंदणी करावी खतावरील जीएसटी बाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी केंद्र शासनाने मदत दुरध्वनी क्रमांक दिलेला आहे. त्यांचा क्रंमाक 011-26106817 असा आहे. त्याचा वापर करुन खतावरील जीएसटी बाबत शंका असल्यास प्रश्न विचारुन शंकानिरसण करण्यात यावे. सदरचा मदत क्रमांक केंद्र शासनाने fert.nic.in या संकेत स्थळावर सुध्दा प्रशिध्द केलेला आहे. या व्यतिरिक्त केंद्र शासनाने सर्व साधारण जीएसटीबाबत येणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी दुरध्वनी क्रमांक 011-23094160, 011- 23094161, 011- 23094162, 011- 23094168, 011- 23094169 वर मदत केंद्रे म्हणून जाहीर केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठवाड्यात खरीप हंगामात ७ लाख हेक्टर क्षेत्र पेरणी विना

swarit

नांदेड जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतून ई-भुमिपुजन संपन्न

News Desk

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात ७ हजार सौर कृषिपंप लावण्यास मंजुरी

swarit