मुंबई | महाराष्ट्रातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची वाढ आपल्याला मान्य नसून प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सरकारकाला विनंती केली होती. तसेच अनुदानाची मागणी मान्य न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी सरकारला दिला होता. परंतु शेट्टी यांच्या मागण्यांचा सरकार दरबारी विचार न झाल्यामुळे खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी मध्यरात्रीपासून प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे अनुदान मिळावे यासाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
राज्यात रविवारी रात्री १२ वाजल्यापासून दुधाचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यात ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडविण्यात आले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने कंबर कसली असून आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी रात्री बारानंतर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर आंदोलनाला सुरुवात केले.
#Maharashtra: Police serves notice to All India Kisan Sabha's Dr Ajit Navle to not organise or participate in any protest supporting demands by Swabhimani Shetkari Sangathna, a farmers org that has threatened to block milk supply to Mumbai, demanding price hike for milk farmers.
— ANI (@ANI) July 16, 2018
सरकारला सुबुद्धी दे विठ्ठला, खासदार राजू शेट्टी यांचे साकडे
प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (सोमवार) पासून पुकारलेल्या बेमुदत दूध बंद आंदोलनास खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपूरच्या विठूरायाला दुग्धाभिषेक करुन प्रारंभ केला. ‘विठ्ठला या सरकारला सुबुध्दी दे’, अशी विनवणी आपण विठूरायाला केल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.
कर्नाटक व केरळच्या धर्तीवर राज्यातही दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (सोमवार) पासून पुकारलेल्या बेमुदत दूध बंद आंदोलनास खासदार राजू शेट्टी यांनी विठूराया दुग्धाभिषेक करुन प्रारंभ केला. ‘विठ्ठला या सरकारला सुबुध्दी दे’, अशी विनवणी आपण विठूरायाला केल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.