HW News Marathi
कृषी

राज्यात दूध आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलनकर्त्यांनी फोडल्या गाड्या

पुणे | राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या दूध आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. रविवारी मध्यरात्री पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला दुधाचा अभिषेक करुन आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावत रविवारी मध्यरात्री १२ वाजेपासून दुधाचे आंदोलन सुरू असून राज्यात ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडविण्यात आले आहेत.

क्रांती, माऊली, मातोश्री, सोनईच्या गाड्या देखील कार्यकर्त्यांनी फोडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पुण्यात दुधाच्या पाच गाड्या कार्यकर्त्यांनी आंदोलना दरम्यान फोडल्या आहेत. तर बुलडाण्यात दूध दरवाढ आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होताना पहायला मिळत आहे. सौराष्ट्र एक्स्प्रेसला अमूल दुधाचा डबा कार्यकर्त्यांनी जोडू न दिल्यामुळे दुध पुरवठ्यावर याचा विषेश परीणाम होत आहे. चाळीसगावमध्ये शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केल्यामुळे एक तास रस्ता रोखून धरला होता. दूध दरवाढ आंदोलनामुळे राजहंस, प्रभातसह सर्वच दूध संकलन आणि वितरण बंद राहणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रात ठिकठिकाणी पहायला मिळत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कै.वसंतराव नाईक जयंतीच्या दिवशी कृषी दिन साजरा करण्यात आला.

News Desk

शेतक-याने दिल्या जानकरांना शिव्या

News Desk

फळं खरेदीसाठी चीनी व्यापारी शेतक-यांच्या बांधावर

News Desk