HW News Marathi
कृषी

भारतात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

भारतातील पहिली हायड्रोस्टॅटिक आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टर संकल्पना सादर

ग्लोबल अॅग्रिकल्चरल प्रोडक्ट्स आणि सोल्युशन्स पोर्टफोलियोचे विस्तारीकरण

नवी दिल्ली, एस्कॉर्ट्स या भारतातील अग्रणी अभियांत्रिकी उद्योग समूहातर्फे आज भारतातील पहिला इलेक्ट्रिक व हायड्रोस्टॅटिक संकल्पनेवर आधारित ट्रॅक्टर सादर करण्यात आला. त्याचचप्रमाणे २२ एचपीपासून (अश्वशक्ती) ९०एचपीपर्यंतच्या (अश्वशक्ती) ट्रॅक्टरच्या निर्यात आणि स्थानिक बाजारपेठेत फार्मट्रॅक आणि पॉवरट्रॅक या ब्रँडअंतर्गत विस्तारीकरण केले. हे ट्रॅक्टर युरोप आणि अमेरिकेतील टिअर ४ उत्सर्जन नियमांचे पालन करतात आणि यांचे ४३ आंतरराष्ट्रीय वितरक आहेत.

यात त्यांचे फ्लॅगशिप उत्पादन असलेली अधिक अश्वशक्तीची (७० ते ९० एचपी) न्यू एस्कॉर्ट्स ट्रॅक्टर सीरिज (NETS), २२ ते ३० एचपी या टप्प्यातील कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर, चालनसुलभतेसाठी केबिनचा पर्याय उपलब्ध असलेले भातकामासाठी आणि वाहणावळीसाठी उपयोगी पडणारे क्रॉसओव्हर ट्रॅक्टर समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे या ट्रॅक्टरमध्ये टिअर ४ उत्सर्जन नियमाला अनुसरून असलेले CRDiइंजिन आहे. या उपयुक्ततांमुळे हे ट्रॅक्टर भारतातील नव्या पिढीच्या शेतकऱ्यांप्रमाणेच अमेरिका, युरोप, लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशियातील देशांमधील ग्राहकांच्या गरजा भागवतील.

“जागतिक बाजारपेठेसाठी उत्पादने विकसित करण्याच्या आणि ग्राहकांसाठी अद्ययावत आणि आकर्षक गुणवैशिष्ट्ये असलेली सादर करण्याचा एस्कॉर्टचा परिवर्तनीय प्रवास सुरू झाला आहे. आज सादर करण्यात आलेल्या उत्पादनांमधून आजच्या पुरोगामी शेतकऱ्यांचा कामाचा आवाका आणि गरजा लक्षात घेत तयार करण्यात आले आहे. आम्ही जगभरात पोहोचण्यासाठी विस्तारीकरण करत आहोत आणि ग्राहक व बाजारापेठ यांच्या आवश्यकता पूर्ण करणारी उत्पादने विकसित करणार असल्याची माहिती एस्कॉर्ट्स लिमिटेडचे अध्यक्ष राजन नंदा यांनी दिली.

एस्कॉर्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक निखिल नंदा पुढे म्हणाले, “इलेक्ट्रिक ट्रॅक्टर ही संकल्पना सादर करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. हे तंत्रज्ञान आमच्या काटकसरीच्या अभियांत्रिकीचे द्योतक असून भरतातील सर्वोत्तम उत्पादन आम्ही जगासाठी सादर केले आहे. जगाच्या अन्नधान्याच्या मागणीची पूर्तता करण्यात योगदान देण्याचे आमचे परिवर्तनीय उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जगभरातील शेतकऱ्यांना अधिकाधिक तांत्रिक शेती उत्पादनांचा आणि उपाययोजनांचा वापर करण्यास आम्ही सक्षम करू.

आज सादर करण्यात आलेली न्यू एस्कॉर्ट ट्रॅक्टर सीरिज जगभरातील ग्राहकांना सुविधा आणि अचूक शेतीसाठी एक वेगळाच अनुभव देईल. दर वर्षी ६ सप्टेंबर रोजी एस्कॉर्टतर्फे एसक्लुझिव्हच्या माद्यमातून एस्कॉर्टची एक्सक्लुझिव्ह उलथापालथ घडवून आणणारी नवनवीन उत्पादने सादर करण्यात येतील. हा दिवस ‘द लाँच डे’ म्हणून ओळखला जाईल.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांनी शेतीविषयक अभ्यास विदेश दौ-यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करा

News Desk

दुर्गम भागात रस्त्यांवरही होत आहे भाजीविक्री

News Desk

राजू शेट्टींना सरकारकडून चर्चेचे निमंत्रण; चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित

Chetan Kirdat