HW News Marathi
कृषी

शेतमालास शाश्वत बाजारपेठ व अधिकचा बाजारभाव मिळवून देऊ | शरद पवार

पुणे | महा ऑरगॅनिक अॅन्ड रेस्युड्यु फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) अंतर्गत “हेल्दी हार्वेस्ट” या पुण्यातील पहिल्या रिटेल आऊटलेटचे उदघाटन ॲम्पी थियटर,मगरपट्टा सिटी पुणे येथे शरद पवार (मा. केंद्रीय कृषिमंत्री) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे आयोजन मोर्फाचे व्यवस्थापकीय संचालक युगेंद्र पवार यांनी केले होते.

महा ऑरगॅनिक अॅन्ड रेस्युड्यु फ्री फार्मर्स असोसीएशन (मोर्फा) यांच्या वतीने हेल्दी हार्वेस्ट या पहिल्या आऊटलेट मध्ये ग्राहकांना राज्याच्या विविध भागातून उत्पादित केलेला विषमुक्त स्वच्छ व ताजा शेती माल कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे.

विषमुक्त शेंद्रिय शेत मालाला मागणी वाढत असून पुण्यात अजून दोन ठिकाणी व त्याच बरोबर मुंबईतही अशी आऊटलेट लवकरच चालू करण्यात येतील व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालास शाश्वत बाजारपेठ व अधिकचा बाजारभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असे शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितले.

सदर कार्यक्रमाला प्रतिभा पवार राज्याचे कृषी आयुक्त सच्चीन्द्र प्रताप सिंह, सतीश मगर, राजेंद्र पवार आ.दत्तामामा भरणे, मा आ अशोकबापू पवार, उद्योजक हणमंत गायकवाड, अंकुश पडवळे, प्रल्हाद वरे आदी मान्यवरांसह राज्यातील सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वाती शिंगाडे यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

”पेसा”मुळे सौरऊर्जेने ठाणपाड्यात पाणी

News Desk

‘हुमनी’ अळीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ 

News Desk

पंतप्रधान पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदत      

News Desk