HW News Marathi
मनोरंजन

पंडित नेहरूंचे लहान मुलांसोबतचे काही निवडक क्षण

१४ नोव्हेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते. हा दिवस आपण ‘बालदिन’ म्हणून साजरा करतो. पंडित नेहरूंचे लहान मुलांवर खूप प्रेम होते. देशाचे भविष्य हे लहान मुलांच्या हाती असते, असे ते कायम म्हणत. लहान मुले पंडित नेहरूंना ‘चाचा नेहरू’ अशीच हाक मारत. १९६४ साली नेहरूंच्या मृत्यूनंतर १४ नोव्हेंबर ही नेहरूंची जयंती ‘बालदिन’ म्हणून साजरी करण्यात यावी असा प्रस्ताव सादर केला गेला होता. त्यांनतर देशात पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्म दिवस बालदिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

आम्ही तुम्हाला पंडित नेहरूंचे असे काही फोटोस दाखवणार आहोत, ज्यावरून आपल्या लक्षात येईल की पंडित नेहरूंचे लहान मुलांवर जीवापाड प्रेम होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण फोर्टिस रुग्णालयात दाखल

News Desk

मोडी लिपीतून दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या पणत्या

swarit

Independence Day | जाणून घ्या… काय आहे लाल किल्ल्याचा इतिहास

News Desk
मनोरंजन

पंडित नेहरू यांच्याविषयी तुम्हाला हे माहित आहे का ?

News Desk

पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरूंचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद शहरात येथे झाला. पंडित नेहरूंचा पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. पंडित नेहरूंचे लहान मुलांवर जीवापाड प्रेम होते. देशाचे भविष्य हे लहान मुलांच्या हाती असते, असे ते कायम म्हणत. लहान मुले पंडित नेहरूंना ‘चाचा नेहरू’ अशीच हाक मारत. १९६४ साली नेहरूंच्या मृत्यूनंतर १४ नोव्हेंबर ही नेहरूंची जयंती ‘बालदिन’ म्हणून साजरी करण्यात यावी असा प्रस्ताव सादर केला गेला होता. पंडित नेहरूंचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.

११ वेळा शांततेच्या नोबेल पुरस्काराचे नामांकन, पुरस्कार मात्र नाही

पंडित जवाहरलाल नेहरुंना १९५० ते १९५५ या काळात तब्बल ११ वेळा शांततेच्या नोबेल पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. परंतु त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार कधीही मिळाला नाही. पंडित जवाहरलाल नेहरू हे शांततेच्या मार्गाने जाणाऱ्या व्यक्तींमधील एक म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध होते.

जवाहरलाल नेहरूंचे आजोबा होते दिल्लीचे शेवटचे ‘कोतवाल’

पंडित जवाहरलाल नेहरूंचे आजोबा ‘गंगाधर पंडित’ हे दिल्ली प्रदेशाचे शेवटचे कोतवाल होते. १८५७ सालच्या युद्धाच्या पूर्वीपर्यंत त्यांनी ‘कोतवाल’ पद सांभाळले. १८६१ साली मात्र आपल्या संपूर्ण कुटुंबासह गंगाधर पंडित हे आग्रा येथे स्थायिक झाले.

तुरुंगात लिहिले “Toward Freedom” हे आत्मचरित्र

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेल्या अनेक नेत्यांनी त्यांची आत्मचरित्रे ही तुरुंगातच लिहलेली आहेत. १९३५ साली तुरुंगात पंडित नेहरू यांनी देखील आपले “Toward Freedom” नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. पंडित नेहरूंचे हे आत्मचरित्र १९३६ साली अमेरिकेत प्रकाशित करण्यात आले होते.

‘नेहरू जॅकेट’ म्हणजे राजकारणी असे समीकरण

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या काळात सर्वच राजकारणी हे केवळ पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करत असत. पंडित नेहरू हे असे पहिले नेते होते ज्यांनी त्या सदऱ्यावर ‘जॅकेट’ चढविले. त्या काळात एखाद्या व्यक्तीने नेहरू जॅकेट परिधान केले आहे म्हणजे तो राजकारणी असे समीकरणच बनले होते.या ‘नेहरू जॅकेट’ची पहिली कल्पना पंडित नेहरूंची होती. म्हणूनच हे जॅकेट आता नेहरूंच्या नावाने म्हणजेच ‘नेहरू जॅकेट’ म्हणून ओळखले जाते.

सिगरेटचे प्रचंड व्यसन

पंडित जवाहरलाल नेहरू भोपाळ दौऱ्यावर असतानाचा त्यांचा किस्सा अत्यंत गंमतीदार आहे. भोपाळ दौऱ्यावर असताना त्यांच्याजवळ एकही सिगरेट उरली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडत्या ब्रँडची सिगरेट आणण्यास पाठविले. परंतु भोपाळ मार्केटमध्ये कुठेही नेहरूंच्या ब्रँडची सिगरेट मिळली नाही. अखेर हट्टाला पेटलेल्या नेहरूंनी केवळ त्यांच्या आवडत्या ब्रॅंडची सिगारेटसाठी चक्क त्यांचे एयरजेट इंदोरला पाठवले.

भारतीय इतिहासाचे सखोल ज्ञान

पंडित नेहरू हे काश्मिरी पंडित होते. त्यामुळे त्यांनी प्राचीन भारत, वेदांचे अनेक वर्षे सखोल अभ्यास केला होता. पंडित नेहरूंच्या “Discovery of India” या पुस्तकामधून त्यांचे भारतीय संस्कृती आणि भारताच्या इतिहासाविषयी अनन्यसाधारण ज्ञान आपल्या लक्षात येतो.

फाळणीस अप्रत्यक्षरित्या जबाबदार

इतिहासाच्या अभ्यासकांच्या मते भारताची फाळणी होण्यास महात्मा गांधीजीसोबत पंडित नेहरु देखील अप्रत्यक्षरित्या जबाबदार होते. मोहम्मद अली जिन्ना यांना स्वतंत्र भारताचे पंतप्रधान व्हायचे होते. परंतु महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंना याला विरोध केला. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर जिन्ना यांचे कॉंग्रेसमधील वर्चस्व देखील जवळपास संपले होते. यामुळे चिडून जिन्ना यांनी मुस्लीम धर्माच्या आधारावर नव्या देशाची मागणी केली.

Related posts

‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमामध्ये ‘अमित शहा’च्या भूमिकेत मनोज जोशी

News Desk

जाणून घ्या…कुंभमेळ्यात येणाऱ्या १४ आखाड्यांबद्दल

News Desk

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला ईडीचा समन्स

News Desk