HW News Marathi
मनोरंजन

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला ईडीचा समन्स

मुंबई | बॉलीवुड अभिनेता अरबाज खानच्या चौकशीनंतर बॉलिवूडचे आयपीएल आणि सट्टेबाजीत असलेले मोठे कनेक्शन समोर आले आहे. त्याच बरोबर बिटकॉईनच्या व्यवहारातही बॉलिवूडचा मोठा हात आहे. बिटकॉईन संदर्भात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांना ईडीकडून बिटकॉईन समन्स पाठवण्यात आले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंद्रा यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली असून काही दिवसांपुर्वी या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाजला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. अमित भारद्वाजच्या चौकशी दरम्यान, शिल्पा शेट्टीच्या पतीचे नाव समोर आले आहे. त्याला ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यात अनेक बॉलिवूड कलाकारांचा हात असल्याचेही बोलले जात आहे.

बिटकॉईन घोटाळा हा २ हजार करोड रुपयांचा असून यात बॉलिवूडच्या कलाकारांचा मोठा हात आहे. ‘gatbitcoin.com’ नावाच्या वेबसाइटवर अनेक लोक एकमेकांना फसवतात. यात अनेक बॉलिवुड कलाकार सहभागी आहेत. त्यामुळे येत्या काळात ईडी रडारवर कोणकोण आहे हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधुरा प्रवास..त्याचा आणि तिचाही….

News Desk

Anant Chaturdashi |गणेशोत्सव मंडपासमोर मोटारसायकल हळू चावण्यास सांगितल्याने हत्या

swarit

मराठीतून द्या नाताळच्या शुभेच्छा…

News Desk