HW News Marathi
Covid-19

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण; अधिवेशनातील आमदार, मंत्र्यांना धोका

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत स्वतः वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत ही बातमी दिली आहे. विशेष म्हणजे वर्षा गायकवाड काल (सोमवारी) अधिवेशनात देखील उपस्थित होत्या. अधिवेशनात त्या मंत्री, आमदार आणि इतर लोकांच्या संपर्कात आल्यामुळे आता चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या वर्षा गायकवाड विलगीकरणात आहेत.

सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु असून अधिवेशनातही कोरोनाने शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. वर्षा गायकवाड या काल विधान परिषदेत आणि विधानसभेत उपस्थित होत्या. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील लागण होण्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाड या अधिवेशनात मंत्र्यांसह अनेक आमदारांच्या संपर्कात आल्यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे. तर गायकवाड यांना याआधीही सप्टेंबर, २०२० मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते.

वर्षा गायकवाड यांचे ट्वीट

वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, काल संध्याकाळी कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्यामुळे मी कोरोना चाचणी केली होती. या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असून मी स्वतःला घरीच विलगीकरण केले आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून जे माझ्या संपर्कात आले होते, त्यांनीही काळजी घ्यावी, असे आवाहनसुद्धा वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1475691898954153988?s=२०

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांचा वैज्ञानिक सल्लागार ग्रुपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

News Desk

राज्यपाल कोश्यारींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

News Desk

देशातील ‘या’ राज्यात पुन्हा ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला

News Desk