HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासांमध्ये ३ लाख १७ हजार ५३२2 कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यानी निर्बंध लावले आहेत. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख १७ हजार ५३२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४९१ जणांचा कोरोनाने मृत्या झाला आहे. तसेच देशात आता ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. सध्या देशात ९ हजार २८७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर गेल्या २४ तासांत २ लाख २३ हजार ९९० रुग्ण कोरोनामुख्त झाले आहेत. देशात वारंवार १६.४१ टक्के पॉझिटिव्हीटी रेटवर आला आहे. 

सध्या देशात १९ लाख २४ हजार ५१ कोरोना रुग्ण सक्रिय असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारीतून मिळाली आहे. तर आतापर्यंत देशात ४ लाख ८७ हजार ६९३ लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. तसेच देशात ३ कोटी ५८ लाख ७ हजार २९ लोक संसर्गमुक्त झाले आहे. आता सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात १५८, मुंबईतील ३१ रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या २ हजार ७४ वर पोहोचली आहे. तर, १ हजार ९१ जण ओमायक्रॉन संसर्गातून मुक्त झाले आहे.

महाराष्ट्रात काल (१९ जानेवारी) ४३ हजार ६९७ नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४९ रुग्णांची कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४६ हजार ५९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून राज्यात आज २१४ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत राज्यात २ हजार ७४ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १ हजार ९१ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या सर्व चाचण्या अन् उपचार मोफत

News Desk

अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना बैठक सुरु  

News Desk

Nisarg cyclone| शरद पवारांचा कोकण दौरा सुरू

News Desk