HW News Marathi
Covid-19

आमदार रोहीत पवार कोरोनाची लागण; फेसबुक पोस्ट करत दिली माहिती

बारामती | राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा वाढत असल्याचे चित्र आहे. पुन्हा एकदा कोरोनाने डोकंवर काढले आहे. त्यातच राज्यातील आमदार,मंत्री आणि नेते मंडळींनाही कोरोनाची लागण होत आहे. आता राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. रोहित पवारांनी फेसबुक पेजवरुन पोस्ट करत त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली.

गेला आठवड्याभरात राज्यातील अनेक कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. यात राज्यातील अनेक राजकीय नेते, मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, केसी पाडवी, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे यांच्यासह एकूण १० मंत्री कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. याशिवाय भाजपा आमदार पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

रोहित पवार फेसबुक पोस्टमध्ये नेमके काय म्हणाले

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, “तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत!”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्र मॉडेलचा वापर करा, अन्यथा देशातील कोरोना नियंत्रणात येणार नाही”, राऊतांचा इशारा

News Desk

महाराष्ट्रासह ५ राज्यांत कोरोना रुग्णांची वाढ, केंद्राने पाठवली आरोग्य पथके

News Desk

२५ आणि २६ जुलैला नागपुरात जनता कर्फ्यु !

News Desk