HW News Marathi
Covid-19

पुण्यात शिवसैनिकाला सुखाने जगू द्या; शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

मुंबई | खेड पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने आलेल्या चित्र दिसून आले. यावेळी दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये वाद सुरू झाला. यात पुणे जिल्ह्यातील शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिन्ही पक्ष एकत्र येवून महाविकासआघाडी सरकार स्थापन झाले. या महाविकासआघाडीमध्ये शिवसेनेच्या वाटेला मुख्यमंत्री पद आले. आता महाविकासआघाडी सरकार सत्ते येवून २ वर्ष झाली असून राज्य स्थरावर नेत्यांमध्ये सर्व चांगले असले तरी स्थानिक पातळीवर महाविकासाघाडीच्या पक्षात सर्व आलबेल आहे असे चित्र दिसत नाही. 

आढळराव पाटील यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केला आहे. पाटील म्हणाले, “जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचा डाव सुरू असून आमचे अस्तित्व राहू द्या. आमची फार काहीही मागणी नाही, शिवसैनिकाला सुखाने जगू द्या, असे शिवाजी आढळराव पाटील म्हणाले. तसेच गृहमंत्र्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पाटलांनी सांगिते. आम्ही कुणाच्या नादी लागत नाही, आम्हला जगू द्या, हा सर्व प्रकार पक्षातील वरिष्ठांना आम्ही वेळोवेळी सांगत आहोत. 

राऊतांनी अजित पवारांना दिला इशारा 

या प्रकरमाचे प्रडसाद राज्य स्थरावर पडलेले दिसून आले. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना म्हटले, “अजित दादा तुमच्या आमदारांना वेसण घाला नाही तर पुढच्या वेळी महाविकासआघाडी राहील अथवा न राहील खेड शिवसेनेचा आमदार असेल,” असा इसारा राऊतांनी दिला होता.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक ! राज्यात १०,२२१ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

सामना अग्रलेख : महाराष्ट्र पुढेच जाईल ! संकटाचे काय घेऊन बसलात !

News Desk

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांची कोरोनावर यशस्वी मात !

News Desk