HW News Marathi
Covid-19

राज्यातील 14 जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, निर्बंध शिथील

मुंबई | राज्यातील मुंबईसह १४ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोना निर्बंधात सुट देत नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. राज्य सरकारने नव्या नियमानुसार १४ जिल्ह्यात ४ मार्चपासून  सिनेमा आणि नाट्यगृहे, सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळेही १००  टक्के क्षमतेने सुरु होणार आहे. इतर जिल्ह्यात ५०  टक्के क्षमतेने सुरू करण्याची अट ठेवण्यात आली आहे. परंतु, राज्य सरकारने निर्बंध शिथील केले असले तरी कोरोना नियमांचे पालन करणे महत्वाचे असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे कोरोना नियमात शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती सुधारीत असलेल्या जिल्ह्याचा समावेश ‘ए’ श्रेणी करण्यात आला आहे. तर ‘बी’ श्रेणी ज्या जिल्ह्यात कोरोनाची स्थिती जास्त आहे, त्यांचा समावेश करण्यात आला आहे. यानुसार ‘ए’ श्रेणीत मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर या १४ जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. आणि या जिल्ह्यात ४ मार्चपासून नव्या गाईडलाईन्स लागू होणार आहेत. राज्यातील ए श्रेणीतील जिल्ह्यात ९० टक्के नागरिकांनी पहिला डोस मिळाला आहे. तर ७० टक्के नागरिकांचे दुसरा डोस मिळाला आहे. या श्रेणीतील जिल्ह्यातील पॉझिटीव्हिटी रेट दहा टक्के आहे. तर या जिल्ह्यात आयसीयूतील बेडची क्षमता ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे.

१४ जिल्ह्यात १०० टक्के क्षमतेने काय सुरू होणार

सरकारी, आणि खासगी कार्यालय, शाळा, सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पर्यटन स्थळं, हॉटेल्स, बार, स्पा, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जीम, जलतरण तलाव, मनोरंजन मैदाने सुरू होणार आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील कंन्टेटंमेंट झोन वगळून इतर भागातील एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी

News Desk

“आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका,” सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला फटकारले

News Desk

कोरोनाने वाचलो अन् महागाईने मेलो…राज्यभर राष्ट्रवादीच्या महिलांचे आंदोलन!

News Desk