HW News Marathi
Covid-19

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरण नियोजनाचा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उद्या आढावा घेणार

मुंबई । कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यासाठी आता १५ ते १८ वयोगटातील तरूणांना लस देण्यास मान्यता मिळाली आहे. याअनुषंगाने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी उद्या (३ जानेवारी) सर्व संबंधितांची तातडीची बैठक आयोजित केली आहे.

कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांचे १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्य शासन यासाठी सर्व पातळीवर प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत शालेय शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. त्याचा प्रा.वर्षा गायकवाड या बैठकीत आढावा घेतील.

या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांसह शिक्षण आयुक्त, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, महानगरपालिका/नगरपालिकेचे शिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी, गट शिक्षणाधिकारी ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनच्या काळात राज्यात ३६६ गुन्हे दाखल, तर १९८ लोकांना अटक

News Desk

‘दुकाने ४ नंतर उघडी ठेऊन वसुली सुरु’; मनसेचा गंभीर आरोप

News Desk

मजुरांना रोजगार निर्माण होणार, ‘गरीब कल्याण रोजगार योजने’चे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन

News Desk