HW News Marathi
Covid-19

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण

जालना | केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण झाली आहे. दानवेंना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी टेस्ट केली. यानंतर कोरोनाची रिपोर्ट आल्याची माहिती दानवेंनी त्यांच्या ट्विट आणि फेसबुकवर पोस्ट करून सांगितले आहे. दरम्यान, दानवेंवर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण उपचार घेत असून संपर्कातील सर्वांनी कोरोना टेस्ट करण्याचे सांगितले.

दानवेंनी ट्वीटमध्ये म्हणाले, “कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने,माझी कोरोना टेस्ट केली असता टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशन मध्ये आहे,याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी,त्याच प्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी. धन्यवाद.” दानवे गुरुवारी (६ जानेवारी) रात्री मुंबई येथून रेल्वेने जालना येथे आले होते. परंतु, दानवेंची प्रकृती चांगली नसल्याने त्यांनी दुपारी कोरोना चाचणी केली. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णाची संख्या वेगाने वाढत आहे. राज्यसह देशातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण केली आहे. राज्यात काल (७ जानेवारी) ४० हजार ९२५ नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १४ हजार २५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना रुग्णांच्या मृतदेहात व्हायरसचे किती वेळ राहतो ?, ICMR काय म्हणते ?

News Desk

अजित पवारांचं सगळं ऐकता मग ‘हे’ का ऐकत नाही?, सुप्रिया सुळेंकडून कार्यकर्त्यांची कानउघाडणी

News Desk

पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच | उपमुख्यमंत्री अजित पवार 

News Desk