HW News Marathi
क्राइम

ट्रक अपघातात दोघांचा मृत्यू एक गंभीर जखमी

मुंबई कांदिवली येथे हायवेवर शुक्रवारी रात्री दोन ट्रकमध्ये आपघात झाला असुन या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यात ड्रायव्हर जखमी झाला आहे. जखमीना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दोन्हा ट्रक मासे घेऊन क्रापड मार्केटला जात होते. मात्र कांदिवली क्रॉस करत असताना ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने दिस-या ट्रकला धडक दिली. अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अधिक माहिती पोलिस करत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लुटमार करणाऱ्या पाच जणांना अटक

News Desk

शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीला जामीन, सीबीआयच्या विनंतीनंतर ६ आठवड्यांची स्थगिती

swarit

वर्सोवा-घाटकोपर मेट्रो वन सेवा उद्या ‘या’ वेळेत असणार बंद

Aprna
महाराष्ट्र

काँग्रेस उद्यापासून राज्यभर आंदोलन करणार

News Desk

रावसाहेब दानवेंची भाषा‘दानवा’सारखीः खा. अशोक चव्हाण

मुंबई राज्यातीलतूर उत्पादक शेतक-यांना शिवीगाळ करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भाषा दानवासारखी आहे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची भाषा दानवासारखीच आहे. भाजप नेत्यांच्या डोक्यात सत्तेची नशा गेल्याने ते बेताल वक्तव्ये करित आहेत. राज्यातला तूर उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत असून त्या शेतक-यांची सगळी तूर खरेदी करून शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी शेतक-यांना शिवीगाळ करित आहेत. सत्तेची नशा भाजप नेत्यांच्या डोक्यात गेल्याने ते वारंवार शेतक-यांचा अवमान करत आहेत. आता तर शेतक-यांना शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. राज्यातले शेतकरी भाजप नेत्यांची ही नशा उतरवतील असे खा. अशोक चव्हाण म्हणाले.

शेतक-यांना साले म्हणून संबोधणा-या दानवे यांच्याविरोधात काँग्रेस पक्ष राज्यभरात आंदोलन करणार असून दानवे यांना “साला दानवे”अशी पदवी काँग्रेसकडून देण्यात येणार आहे. भाजपला थोडीही लाज असेल तर त्यांनी रावसाहेब दानवेंवर कारवाई करावी आणि राज्यातील शेतक-यांची माफी मागावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Related posts

मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी – नवाब मलिक

News Desk

कितीही स्ट्रॅटेजी करा, 2024 मध्ये येणार तर मोदीच, पवार-प्रशांत किशोर भेटीवर फडणवीसांचं वक्तव्य

News Desk

महाविकासआघाडीचे खातेवाटप सामनातून जाहीर, जाणून घ्या कोणाला कोणती खाती 

News Desk