HW News Marathi
क्राइम

दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

उत्तम बाबळे

भोकर : – शाळकरी मुलाला उमरी येथील वस्तीगृहात सोडून मोटार सायकल दुचाकीवरुन .हिमायतनगर कडे जात असताना दुचाकी स्वारांनी भोकर – किनवट रस्त्यावरील असलेल्या सुधा प्रकल्पाच्या वळणावर एका झाडाला धडकल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाले आहेत.

याबाबत सविस्तर असे की, दुधड ता.हिमायतनगर येथील रहिवासी असलेले नारायण गणपत वाठोरे वय ४३ वर्षे व किरण किशन वाघमारे वय ३० वर्ष हे दोघे दि.१६ फेब्रुवारी २०१७ रोजी जि.प.व प.स.चे मतदान करुन दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी वाठोरे यांच्या गावी आलेल्या शाळकरी मुलास उमरी येथील वस्तीगृहात सोडण्यासाठी सीबीझेड एम.एच.१२ एफ.क्यु.८३०९ या क्रमांकाच्या त्यांच्या मोटार सायकल दुचाकी वरुन त्या मुलास सोबत घेऊन गेले.वाठोरे यांचा इयत्ता ९ वी वर्गात शिकत असलेल्या लहान मुलास उमरी येथील शासकिय वस्तीगृहात सोडून नारायण वाठोरे व किरण वाघमारे हे दोघे त्या दुचाकीवरुन गावाकडे परत निघाले. भोकर ते किनवट रस्तयावरील थेरबन पाटी जवळ सुधा प्रकल्पाच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ती दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जोराने आदळली.यात ते दोघे ही दुचाकीसह मोठ्या खड्यात पडले. यातच त्यांचा जागीच मृत्यु झाला.दरम्यान दुचाकी व मयत हे त्या मोठ्या खड्यात पडल्याने ते कुणाच्याही दृष्टीस पडले नाहीत.दि. १९ फेब्रुवारी रोजी प्रकल्प परिसरातील शेतकरी मुनिरोद्दीन हमीद मिंया यांना वास आल्याने त्यांनी तो कशाचा आहे म्हणुन त्या खड्यात पाहीले असता त्यांच्या निदर्शनास ते आले. त्यांनी याबाबत फोनवरुन भोकर पोलिसांना सकाळी माहिती दिली.यावरुन येथील पो.नि.संदिपान शेळके व पोलिस जमादार चंद्रकांत पांचाळ यांनी घटना स्थळास भेट दिली.मयतांची प्राथमिक ओळख पटली नसल्याने जमादार चंद्कांत पांचाळ यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद दिल्या वरुन भोकर पोलीसात अपघाती मृत्युची नोंद घेण्यात आली.घटनास्थळाचा रितसर पंचनामा करण्यात आला व ओळख पटल्यानंतर नातेवाईकांना बोलाऊन घण्यात आले.

यातील मयत किरण वाघमारे यांची नुकतीच सोयरीक झाली होती व येत्या ९ मे ला त्याचे लग्न होणार होते.असे मयतांच्या नातेवाईकांनी सांगीतले असून या दोघांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील अधिक तपास जमादार चंद्रकांत पांचाळ हे करीत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ; 250 कोटींचं कर्जफेड प्रकरणात समन्स

Chetan Kirdat

पती आणि पत्नीमध्ये वाद, फेसबुकवर सुसाइड नोट पोस्ट करून पतीने केली आत्महत्या

News Desk

ICICI बँक घोटाळ्याप्रकरणी चंदा आणि दिपक कोचर यांना जामीन मंजूर

Aprna