HW News Marathi
क्राइम

नगरसेवकाच्या नावाने लाखो रूपयाला गंडा

उल्हासनगरमध्ये प्रसिद्ध व्यक्ति आणि नगरसेवकांच्या नावानं फोन करून व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया दिलीप मेघरानीला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. अंबरनाथ, उल्हासनगर आणि पुण्यातही मेघरानीनं अनेक व्यापाऱ्यांना गंडा घातल्याचं उघडकीस आलंय… दिलीप मेघरानीनं एका व्यापाऱ्याला हा फोन करून सव्वा लाखांचा किराणा माल मागवला होता. हा प्रकार तेव्हा उघडकीस आला, जेव्हा हा व्यापारी बिल घेऊन नगरसेवक राजेश वधेरिया यांच्या घरी पोहचला. तेव्हा त्याला समजलं की, वधारिया यांनी अशी कोणती ऑर्डर दिलीच नव्हती त्यांच्या नावानं फोन करण्यात आलाय.

राजेश वधेरिया, नगरसेवक

याबाबत पोलिसांनी तपास केल्यावर स्पष्ट झालंय की, अंबरनाथ, उल्हासनगर आणि पुणे इथेही याप्रकारचे गुन्हे घडले आहेत आणि दिलीप मेघरानी नामक आरोपीला या प्रकरणात अटकही झाली आहे. तेव्हा दिलीपला पोलिसांनी अटक केली.

शकील शेख (वरिष्ठ पोलिस निरीक्षक)

आरोपीनं उल्हासनगरमधील अन्नू मनवानी, चार्ली पारवानी, प्रकाश माखिजा यांच्या नावानंही व्यापाऱ्यांना गंडा घातलाय. त्यानं आणखी काही गुन्हे केले आहेत का, या दिशेेनंही तपास सुरू केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वडिलांच्या हत्येनंतर लेक हिट लिस्टवर

swarit

अखेर अमरावतीतील ‘ती’ तरुणी साताऱ्यात सापडली; पोलीस आज घरी आणणार

Aprna

कोरियन महिलेसोबत विनयभंग होणारा व्हिडिओ व्हायरल; आरोपींना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

Aprna