HW News Marathi
क्राइम

प्रेमात फसवणूक झाल्याने तरुणीची आत्महत्या

पुणेः बारामतीत स्पर्धा परीक्षेला बसलेल्या किर्ती जगन्नाथ शेरे या विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे. किर्ती हिने तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. किर्तीने आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत सीआरपीएफच्या कंमाडोने फसवणूक केल्याचे म्हंटले आहे. गणेश राऊत असे या सीआरपीएफ कंमाडोचे नाव असून त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गणेश राऊतसह इतर 7 जणांवरही बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमात गणेशने आपली फसवणूक केल्याचं किर्तीने चिठ्ठीत लिहीले आहे. तसेच इतर सात जणांनी तिला आत्महत्या करायला भाग पाडल्याचंही तिने चिठ्ठीत लिहीले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील कोंढवा बुद्रुकमध्ये बनावट पनीर कारखान्यावर कारवाई

Manasi Devkar

महिलेवर शिंदवणे घाटात सामुहिक बलात्कार

News Desk

समाजासाठी पुरुषांवरील बलात्कार हा ‘बलात्कार’ नाही का ?

News Desk