HW News Marathi
क्राइम

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या टायपिस्टला अटक

मुंबई विदर्भातील एका व्यवसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे टायपिस्ट म्हणून काम करत असलेल्या महेश सावंतला पोलिसांनी अटक केली आहे. महेश सावंतला रामदास कदम यांनी मलाबार हिल पोलिसांच्या ताब्यात दिलं

महेश सावंत याच्याविरोधात गुरूवारी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रामदास कदम यांच्या नावाचा गैरवापर करुन विदर्भातील एका व्यावसायिकाला कारवाई टाळण्यासाठी खंडणी देण्याची मागणी सावंतांनी केल्याचं सांगितलं जात आहे. विदर्भातील एका वाळू ठेकेदाराला महेश सावंत सातत्यानं फोन करत होता. दहा लाख रुपये द्या, अन्यथा मंत्र्यांशी बोलून तुमच्यावर कारवाई करू, अशी धमकी त्यानं दिली होती.

महेश सावंत यांनी खंडणी मागितल्याची माहिती शिवसेना विभाग प्रमुखांनी रामदास कदम यांना दिली होती. त्यानंतर फोन टॅप करुन कदम यांनी याविषयी माहिती मिळवली आणि सावंत यांना मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात दिलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या नगरसेवकांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

Aprna

माळाकोळीच्या शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांविरोधात दंडात्मक कार्यवाही

News Desk

डीएसकेंना कोणत्याही क्षण अटक होणार

swarit