HW News Marathi
क्राइम

बोधडी येथे जुगार अड्यावर छापा, ११ जणांसह ६ लाखाचा मुद्देमाल केला जप्त

उत्तम बाबळे

नांदेड :- विशेष पोलीस पथकाने १६ जुलै रोजीच्या मध्यरात्री किनवट तालुक्यातील बोधडी शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा मारला असून यात ११ जुगा-यांसह ५,९६,१७०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पोलीस पथकास गुप्त माहिती मिळाली की,किनवट तालुक्यातील माै.बोधडी येथील गजानन मुंडे यांच्या शेतात गोपाळ मेश्राम व नागेश केंद्रे हे जुगार अड्डा चालवित आहेत.या माहिती आधारे विशेष पोलीस पथक प्रमुख सहा.पो.नि.ओमकांत चिंचोळकर व त्यांचे सहकारी कर्मचारी लाठकर, जगताप, वानखेडे, कुलकर्णी, पायनापल्ले,निरणे,जिंकलवाड,गंगुलवार, आवातिरक आणि चालक देवकत्ते यांनी १६ जुलै २०१७ रोजी रात्री ११:३० वाजताच्या दरम्यान दोन पंचासमक्ष गजानन मुंडे यांच्या शेतातील मोकळ्या जागेत व टिन पत्र्याच्या शेड मध्ये छापा मारला असता तेथे झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना जुगारी सापडले.त्यांना ताब्यात घेऊन चाैकशी केली असता गोपाळ मेश्राम,किनवट,विष्णू दराडे,बोधडी,नागेश केंद्रे,बोधडी,हनिफ मोहंमद ,किनवट,गणपत गांदेलवार,संतोष वाकोडे,नंदकुमार दराडे,बोधडी,संतोष नेमानिवार,मोहंम्मद सिराज मो.जाफर,व्यंकन्ना माडपेल्लीवार,किनवट,उदय केंद्रे,बोधडी अशी त्यांची नावे असल्याचे सांगीतले आहे.या सर्वांना ताब्यात घण्यात आले व घटनास्थळी सापडलेली रोख रक्कम ७५,६५०/- रुपये,जुगार साहित्य,मोबाईल व एम.एच.२९ ए.डी.१५९६ क्रमांकाची इंडिका कार असा एकूण ५ लाख ९६ हजार १७० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच सहा.पो.नि.ओमकांत चिंचोलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उपरोक्त ११ जुगारींविरुद्ध मुंबई जुगार कायद्यानुसार किनवट जि.नांदेड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंबानींच्या कुटुंबीयाना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात

Aprna

अपघातातील सहा दुर्दैवी मयतांचे एकाच चितेवर सामुहिक अंत्यसंस्कार

News Desk

6 दहशतवादी अटकेत; मुंबईत राहणारा दहशतवादी नेमका कोण?

News Desk