HW News Marathi
क्राइम

 लातूरमध्ये जनावरांचे मांस नेणारा टेम्पो पकडला

  • अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांची सतर्कता

लातूर – अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळं जनावरांचे मांस घेऊन जाणाऱ्या ट्रकला पकडण्यात पोलिसांना यश आले. लातूरच्या 12 नंबर पाटी परिसरातून जनावरांचे मांस घेऊन जाणाऱ्या टेम्पोला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुमारे 1500 किलो मांस असलेला हा टेम्पो पकडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या लातूर तालुका शाखेतील कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने पोलिसांनी हा टेम्पो पकडला आहे. लातुर तालुका शाखेचे अध्यक्ष किरण मुंडे यांनी टेम्पो पकडुन पोलीसांना फोन केला.घटना स्थळी पोलीस आले त्यांनी त्वरित टेंम्पो ड्रायव्हर शिरान दौला विरुध्द गुन्हा दाखल केला. सुमारे 1500 किलो मांस आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर जाधव, राजाभाऊ चौगुले, कार्याध्यक्ष गोविंद मुंडे, निलकंठ साळुंके, गजानन मुगळे, राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, सरपंच किरण वाकुरे, उप सरपंच विनायक चव्हाण, विशाल चव्हाण, सोनु मोरे,बालाजी घोडके, दिपक गवळी, रणधीर तोडकर, विकास पडीले, नंदु ढोरमारे आदी उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उंडेगावमधील चोरी प्रकरणी वडील फिर्यादी तर मुलगाच निघाला आरोपी

Manasi Devkar

दहशतवादी सलिम खानला मुंबईतून अटक

News Desk

Koregaon Bhima Violence | पाचही आरोपींच्या नजरकैदेत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ

swarit