HW News Marathi
क्राइम

सतरा वर्षानंतर खूनातील आरोपी न्यायालयात हजर

उत्तम बाबळे

नांदेड :- मानसिक व शारिरीक थळ करुन पत्नीला जीवंत जाळून मारणा-या १७ वर्षापासून फरारी असलेल्या आरोपी खूनी पतीने भोकर अति.जिल्हासत्र न्यायालयापुढे शरणागती पत्करली असून पुढील तपासासाठी त्यास २० जुलै रोजी न्यायालयीन कोठडीतून भोकर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. नेहरुनगर भोकर जि.नांदेड येथील रहिवासी साहेबराव पिराजी मेटकर (४०) याने त्याची पत्नी लक्ष्मीबाई ही काळी असल्याने तू दिसायला सुंदर नाहीस म्हणून सतत मानसिक व शारिरीक त्रास दिला.याच कारणावरुन दि.१५ आॅक्टोंबर २००० रोजी दुपारी ३:०० वाजताच्या दरम्यान साहेबराव मेटकर,सासरा पिराजी मेटकर व सासू लक्ष्मीबाई मेटकर या तिघांनी संगनमत करुन राहत्या घरी लक्ष्मीबाई साहेबराव मेटकर हिच्या अंगावर राॅकेल ओतून पेटऊन दिले.यात ती खुपच भाजली गेली होती.उपचारादरम्यान शासकिय रुग्णालय,नांदेड येथे तिचा मृत्यू झाला.या प्रकरणी पती,सासरा व सासू या तिघांविरुद्ध शारिरीक व मानसिक छळ करुन खून केल्याचा गुन्हा भोकर पोलीसांत दाखल करण्यात आला.या गुन्ह्यातील आरोपी सासरा व सासू यांना तत्काली अटक करण्यात आली.न्याय प्रविष्ठ असलेल्या या गुन्ह्यातील सासरा व सासू हे जामीनावर असून तब्बल १७ पासून हा खूनी पती फरार होता.सदरील गुन्ह्याचा खटला भोकर अति.जिल्हासत्र न्यायालयात न्याय प्रविष्ठ आहे.म्हणून दि.१० जुलै २०१७ रोजी अचानकपणे १७ वर्षापासून फरारी असलेला फरारी खूनी पती साहेबराव मेटकर याने भोकर न्यायालयापुढे शरणागती पत्करली.यावेळी न्यायाधीशांना त्यास न्यायालयीन कोठडीत पाठविले.ही माहिती भोकर पोलीसांना प्राप्त झाल्यावरुन त्यांनी गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी त्यास ताब्यात देण्याची विनंती न्यायालयास केली असता न्यायालयाने ती विनंती मान्य केली व पुढील तपासासाठी पो.नि.संदिपान शेळके,सहा.पो.नि.सुरेश भाले यांनी साहेबराव मेटकर यास २० जुलै २०१७ रोजी न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेतले आहे.पुढील तपास सहा.पो.नि.सुरेश भाले व पो.ना.ठाकूर हे करत आहेत.तर १७ वर्षापासून फरारी असलेला खूनी पती अटक झाल्याने खटल्याच्या सुनावनीस गती मिळणार असून मयत लक्ष्मीबाई हिस लवकरच न्याय मिळेल अशी चर्चा होत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्य न्यायाधीशांना दहशतवाद्यांची धमकी

News Desk

कुरिअर बॉय म्हणून घरात घूसून लुटले दोन कोटी

News Desk

पुण्यात सेक्स रॅकेटचे प्रमाण वाढले

News Desk