मुंबई | २००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल प्रसाद पुरोहित याच्यासह अन्य सात आरोपी विरोधात मंगळवारी एनआयए कोर्टाकडून आरोप निश्चित करण्यात आले. त्यांच्यावरील आरोपींविरोधात दहशतवादी कट आखणे आणि हत्या असे आरोप ठेवण्यात आले आहेत.
2008 Malegaon blasts case: All seven accused charged for terror conspiracy, murder and other related offences. Court adjourns the matter till 2:45 pm pic.twitter.com/JwZ8Xt6HrY
— ANI (@ANI) October 30, 2018
मला याआधी एनआयए कोर्टाने क्लिन चीट दिली होती. आता माझ्यावर एनआयए कॉर्टाकडून जे आरोप करण्यात आले आहेत. हे सर्व माझ्या विरोधात काँग्रेसने रचले षडयंत्र आहे. परंतु नेहमी सत्याचा विजय होतो, यावर मला विश्वास असल्याचे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.
Earlier,the NIA had given me a clean chit. Now,charges have been framed against me.This was a conspiracy by Congress but I am confident that I'll come out innocent as the truth always wins: Sadhvi Pragya Singh Thakur, on framing of charges against her in 2008 Malegaon blasts case pic.twitter.com/NEnkEwJ9kq
— ANI (@ANI) October 30, 2018
एनआयए कोर्टाकडून निश्चित करण्यात आलेल्या आरोपांवर स्थगिती देण्यासाठी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने सोमवारी (२९ ऑक्टोबर)ला फेटाळून लावली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे सांगितले. मुंबई हायकोर्टाने एनआयए कोर्टाचे वकील संदेश पाटील यांना पुढील सुनावणीपर्यंत कर्नल पुरोहित यांना दिलेल्या एका अर्जाचे उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
#UPDATE 2008 Malegaon blasts case: Next date of hearing in the case is 2nd November. https://t.co/uwZZUhjLpI
— ANI (@ANI) October 30, 2018
२९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील मशिदीजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १००हून अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य आरोपींना एटीएसने अटक केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.