HW News Marathi
राजकारण

आपल्या विधानानंतर अवघ्या २४ तासातच राहुल गांधींनी दिले हे स्पष्टीकरण

नवी दिल्ली | मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मुलगा कार्तिकेय चौहान याचे नाव पनामा पेपर्समध्ये असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता राहुल गांधी यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले होते. मध्य प्रदेशातील पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले कि, “पनामा पेपर्समध्ये शिवराज सिंह यांच्या मुलाचे नाही तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या मुलाचे नाव आहे. शिवराज सिंह यांचे नाव तर व्यापमं घोटाळ्यात होते.”

आपल्या विधानानंतर २४ तासांच्या आत राहुल गांधी यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. मध्य प्रदेश दौऱ्यात बोलताना राहुल गांधी यांनी शिवराज सिंह चौहान आणि त्यांच्या मुलावर आरोप केले होते. त्यानंतर मध्यरात्री ट्विट करून आपण राहुल गांधी यांच्याविरोधात आज (मंगळवारी) अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे चौहान यांनी म्हटले होते.

त्याचप्रमाणे कार्तिकेय सिंह यांनी देखील ट्विट करून राहुल गांधींचे विधान खोटे असल्याचे म्हटले होते.“पनामा पेपर्समध्ये माझे नाव आल्याचे राहुल गांधी यांचे विधान खोटे आहे. सार्वजनिक व्यासपीठावरुन माझी आणि माझ्या कुटुंबीयांची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे. यामुळे मी दुःखी आहे. ४८ तासांच्या आत जर राहुल यांनी माफी मागितली नाही तर याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करेन,” असे कार्तिकेय यांनी म्हटले होते.

राहुल गांधींचे विधान

“पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे नाव पनामा पेपर्समध्ये आल्यानंतर पाकिस्तानसारख्या देशानेही कारवाई करत त्यांना कारागृहात पाठवले. मात्र शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्समध्ये येऊनही त्यांच्याविरोधात कोणती कारवाई केली गेली नाही,” अशी टीका राहुल गांधींनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन जाधव यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा

swarit

२०१९च्या निवडणुकीत ‘कर्नाटकी कशिद्या’ची छाप दिसेल काय?

News Desk

 देशाचे वीर जवान सीमेवर आणि सीमेपार पराक्रम गाजवत आहेत !

News Desk
राजकारण

पर्रीकर जिवंत असतील तर सत्ताधारी भाजपने सिद्ध करुन दाखवावे !

Gauri Tilekar

नवी दिल्ली | काँग्रेस नेते जितेंद्र देशप्रभू यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांबद्दल अत्यंत वादग्रस्त असे विधान केले आहे. गेले अनेक दिवस मनोहर पर्रीकर यांची प्रकृती चिंताजनक ते राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. “गोव्याचे मुख्यमंत्री आहेत की नाही?, अशी आमच्या मनात शंका निर्माण होत आहे. पर्रीकर जर जिवंत असतील तर ते सत्ताधारी भाजपने गोव्याच्या लोकांसमोर सिद्ध करुन दाखवावे. खासगी किंवा सार्वजनिकरित्या ते कोठेही दिसून येत नाहीत. तुमच्याकडे जर मुख्यमंत्री नाहीत तर मग त्यांचे श्राद्ध घाला,” असे अत्यंत वादग्रस्त विधान जितेंद्र देशप्रभू यांनी केले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना १४ ऑक्टोबरला नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर पर्रीकर सार्वजनिकरित्या कुठेही दिसून आलेले नाहीत. “मुख्यमंत्र्यांच्या आसपास असलेल्या अधिकाऱ्यांचा समूह त्यांच्या गैरहजेरीत अयोग्यपद्धतीने निर्णय घेत आहे,” असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.

दरम्यान, मध्यंतरी गोव्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून भाजप व सत्ताधारी आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या पर्यायी व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात झाली होती. या पर्यायी मुख्यमंत्रीपदासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे नाव सुचविले जात होते. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीच्या समस्येमुळे त्यांना राज्यासाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही, म्हणून हा पर्याय सुचविला जात असल्याचे म्हटले जात होते.

Related posts

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरू; नाशिकमध्ये कोण मारणार बाजी?

Aprna

आता या दोन्ही इंद्रांचे करायचे काय ? मारायचे की सोडायचे ?, पटोलेंचे वादग्रस्त वक्तव्य

News Desk

आम्ही कमळाच्या चिन्हावर लढलो तरीही भाजपमध्ये गेलेलो नाही !

News Desk