HW News Marathi
क्राइम

मुंबईमध्ये ३ वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या

मुंबई | आईला सांगून चॉकलेट आणायला १ रुपया घेऊन गेलेल्या ३ वर्षीय मुलीची मुंबईमधील घाटकोपरच्या रामजीनगर भटवाडी येथे बलात्कार करुन हत्या करण्यात आली. ही घटना आहे ७ ऑक्टोबर २०१५ ची कठुआ आणि उन्नाव बलात्कारापूर्वी अनेक मुलींवर बलात्कार झाले. त्यापैकीच एक प्रकरण म्हणजे बेबी गुडीया बलात्कार आणि हत्या प्रकरण. सध्या मुंबईतल्या बेबी गुडीया बलात्कार आणि हत्या प्रकराणात पुढे आलेली माहीती सर्वसामान्यांना थक्क करणारी आहे………..

घाटकोपरच्या रामजीनगर भटवाडी येथे रहाणा-या एका सर्वसामान्य कुटुंबातील ३ वर्षांची मुलगी गुडीया दिनांक ७ ऑक्टोबर २०१५ ला चॉकलेट आणण्यासाठी म्हणून गेली ती घरात परतलीच नाही. आपली लाडकी लेक घरातून बेपत्ता असल्याचे लक्षात येताच आई लक्ष्मी आणि वडील नागेश यांनी घाटकोपरच्या चिरागनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. परंतु नेहमीप्रमाणे पोलीसांनी आपल्या खास शैलीमध्ये या प्रकरणाचा तपास करु असे आश्वासन बेबी गुडीयाच्या आई वडीलांना दिले. पोलिसांकडून अत्यंत थंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे गुडीयाच्या आई वडीलांनी बेपत्ता असलेल्या गुडीयाचे फोटो पोस्टरवर विभागात ठिकठीकाणी लावले. दुकानात गेलेली गुडीया चॉकलेट घेऊन परत येईल या आशेवर असलेल्या गुडीयाच्या आई लक्ष्मी आणि वडील नागेश यांनी ९ ऑक्टोबरला प्रचंड मोठा धक्का लागला. रहात्या घराजवळ असलेल्या टेकडीवरु गोणीत भरलेला गुडीयाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. परिसरात लोकांच्या मनाला हेलावून टाकणारी ही घटना सर्वानाचा काही काळासाठी प्रचंड दु:ख देऊन गेली. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करुन मृतदेह पोस्टमार्टमसाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला.

बेबी गुडीयाच्या हत्येनंतर पोस्टमार्टम आणि एफआयआरच्या कॉपी गुडीयाच्या कुटुंबीयांना देण्यात आल्या नाहीत. तेव्हा या प्रकरणाला वेगळेच वळण मिळत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. या प्रकरणात सुरुवातील संशयित म्हणून आरुषीच्या आई वडीलांच्या मागे पोलिसांनी चौकशीचा ससेमीरा लावला. या कुटुंबाला रोज पोट भरण्यासाठी रोजगार करावा लागतो हे मुंबई पोलिसांच्या लक्षातच आले नाही. मुलीला न्याय मिळावा म्हणून पोलिसांच्या पाठी धावणा-या या कुटुंबावर महिन्याभरात उपासमारीची वेळ आली. आम्हाला मदत नको न्याय हवा असे म्हणत जिवाच्या आकांताने ओरडणा-या आईची आर्त हाक अद्याप सरकारच्या आणि न्याय देवतेच्या कानापर्यंत पोहचलीच नाही.

बेबी गुडीयाच्या हत्येला ३ वर्षे होताना ७ ऑक्टोबर २०१५ चे अपहरण आणि ९ ऑक्टोबर २०१५ ला समोर आलेले हत्या प्रकरण मुंबई पोलीस सोईस्करपणे विसरल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. एच डब्लू न्यूज ने या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता हे प्रकरण सध्या बंद झालेले नाही तर आम्ही याची चौकशी करत आहोत असे डिसीपी सचिन पाटील यांच्याकडून एच डब्लू न्यूजला सांगण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या या धिम्या गतीच्या तपासामुळे या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट आहेत.

गरीबाला सरकार दरबारी न्याय मिळत नाही असे अनेकदा म्हटले जाते तेच खरे. गुडीया प्रकरणामुळे हे सत्य सर्वांसमोर आले आहे. आम्हाला न्याय हवा न्याय असे जिवाच्या आकांताने ओरडणा-या लक्ष्मी आणि नागेशची हाक अद्याप कुणी ऐकलीच नाही. त्या घरातली आई वडीलांची लेक गेली. पोलिसांत एक गुन्ह्याची नोंद झाली या पलिकडे हे प्रकरण कुणाच्या लक्षातही राहू नये अशा प्रकारे या प्रकरणाला पोलिसांनी बगल दिली. छोट्या छोट्या घटनांचा तपासही हल्ली सिबीआयकडे दिला जातो परंतु ३ वर्षांच्या या बेबीवर झालेला बलात्कार आणि तीच्या हत्येचा तपास सीबीआयकडे का दिला नाही ही बाब सर्वांना विचार करायला भाग पाडते.

बेबी गुडीया हे प्रकरण अपहरण आणि हत्या प्रकरण आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अडीच वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचे देण्यात आले आहे. तसेच मृत्युपूर्वी या मुलीच्या डोक्याला जबर मार लागलेल्याने ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ज्या व्यक्तीने ही हत्या केली त्याने हत्येपूर्वी मुलीवर बलात्कार केला. मुलीचे अपहरण झाल्याची नोंद आहे तशी तिच्यावर बलात्कार झाल्याची नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे पोलिसांनी सुरुवातीपासूनच दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. या केसमध्ये काम करत असलेल्या पोलिस कर्मचा-यांना त्या खुर्चीत बसण्याचा कोणताही अधिकार नाही. बाल लैंगीक आत्याचार संरक्षण कायद्या अंतर्गत ही केस चालवणे गरजेचे होते. परंतु या गुन्हाची नोंदणी ३०२ (हत्या) प्रमाणे झाली आहे. या प्रकरणी तपास करणारे पोलिस कर्मचारी काय करत होते हा प्रश्न उपस्थित होतो. केसची योग्य नोंदणी करण्याची जबाबदारी त्या पोलीस ऑफीसरची होती. जेव्हा तपासात काही निष्पन्न झाले नाही तेव्हा ही केस डीसीपींना सोपवने गरजेचे होते. आता या केसला प्रचंड विलंब झाला आहे याला पुर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे यामध्ये पुढे कीती कसून तपास केला जाईल हे पहाणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे. कदाचित या तपासाला वेगळ्या प्रकारे जोर दिला तर जो व्यक्ती गुन्हेगार आहे त्या व्यक्तीला सोडून इतर कुणालाही या प्रकरणी दोषी ठरवले जाण्याची शक्यता आहे. केसला खूप दिवस झाल्यामुळे त्यात तिकका दम राहीलेला नाही. कारण जो गुन्हेगार आहे तो कदाचित हे राज्य किंवा देश सोडून कधीच पळून गेला असेल. त्यामुळे तो व्यक्ती सापडेल की नाही हि पण एक शंका आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणाचा तपास करायचा असेल तर त्या मृत मुलीच्या कपड्यांवरील रक्ताची चाचणी सुरुवातीपासून करावी लागेल. जर या चाचणीत काही ठोस आढळले तरच या प्रकरणाची चौकशी करणे शक्य होईल. हे प्रकरण ज्या पोलीस ऑफीसरने सुरुवातीला हातळले आहे त्याला नोकरीवरुन काढायला हवे. कारण त्या ऑफीसरने एफआयआरमध्ये अपहरण, बलात्कार, हत्या याची नीट नोंद न केल्यामुळे या प्रकरणाला विलंब लागलेला आहे. सुरुवातीपासून यात पोलिसांची हलगर्जी दिसून आली आहे.

  1. एफ आय आर पोस्टमार्टमच्या कॉपी गुडीयाच्या पालकांना का दिल्या नाहीत?
  2. एफआयआरमध्ये बलात्काराची नोंद का नाही?
  3. या केसमध्ये कोणत्याही प्रकारचा तपास अद्याप हाती का लागला नाही?
  4. केस सीबीआयकडे का सोपवली नाही ?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्रेन स्ट्रोकच्या त्रासाला कंटाळून जीएसटी अधीक्षकाची आत्महत्या

News Desk

किरीट सोमय्या यांनी यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते भाजपमध्ये कसे काय – महेश तपासे

News Desk

दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीला सजावट; राम कदमांनी ट्वीट करत मविआ सरकारवर साधला निशाणा

Aprna