पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी स्थापलेल्या ” सामान्य विशेष पोलीस पथकाची असामान्य कामगीरी “
उत्तम बाबळे
नांदेड पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी अवैध धंद्याच्या उच्चाटनासाठी १ जून २०१७ रोजी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकास अवघा १ महिना पुर्ण झाला असून १ अधिकारी व १२ कर्मचारी असलेल्या या विशेष पोलीस पथकाने केवळ ३० दिवसात २२ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी अवैध धंद्यावर छापे मारली . या धाडसी कारवाईत ४४ गुन्ह्यात २३३ आरोपींना गजाआड करत जवळपास ५ कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त केले आहे.यामुळे हे पथक अवैध धंदेवाल्यांसाठी कर्दनकाळ ठरले असून शांतताप्रिय नागरीकांच्या अभिनंदनास पात्र ठरले आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या कारभाराचा पदभार स्विकारला व सर्वप्रथम पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी जिल्ह्यात अवैध धंद्यानी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले असल्याची बाब पत्रकारांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली.यावर उत्तर देतांना पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी मी जिल्ह्यात असे पर्यंत अवैध धंदे व धंदेवाल्यांचे समुळ उच्चाटन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून अशा अपप्रवृत्तींनी प्रवेश करण्याची हिंमत करु नये तथा येथे असतील त्यांनी स्वत: निघुन जावे असा इशारा दिला.तसेच सर्व ठाणे प्रभारी पोलीस अधिका-यांना या धंद्यांवर आळा घालावा व ज्यांच्या क्षेत्रात अवैध धंद्याना अभय मिळत असल्याचे निदर्शनास येईल त्यांच्या विरुद्धही कठोर कारवाई करण्यात येईल अशी तंबी दिली.वास्तविक पाहता स्थानिक पोलीस अधिकारी व मर्मचारी,स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आपापला मोठा ताफा आणि बळ याचा योग्य वापर केला तर अवैध धंद्यांवर आळा घालणे कठीण नाही.परंतू असे होत नाही, कर्तव्य तत्परता,जिद्द,चिकाटी व इच्छाशक्तीचा मेळ घातला तर हे करणे सहज शक्य असते.याचा प्रत्यय आणून देण्यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी मे २०१७ च्या शेवटी हिमायतनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली व जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी पो.काॅ.वानखेडे,निरणे,कुलकर्णी,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.