HW News Marathi
क्राइम

एक्स्प्रेसमध्ये एका ४० वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने हत्या

मुंबई | भूज-दादर एक्स्प्रेसमध्ये महिलांच्या डब्ब्यात एका ४० वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या मृत महिलेचे नाव दाडिया देवी असे आहे. दाडिया देवी यांच्या गळ्यावर, दोन्ही हातावर आणि छातीवर शस्त्रानं निर्घृणपणे वार करण्यात आले होते. आरपीएफचे जवान रेल्वे तपासात असताना त्यांना एका महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला.

दरम्यान, मुंबई सेंट्रल जीआरपीएफने हत्येचा गुन्हा नोंदवला असून लुटमारीसाठीच दाडिया देवी यांची हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सूरतहून मुंबईला येणाऱ्या या एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी दुपारी १२ च्या दरम्यान दाडिया देवी यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मलिकांच्या आरोपानंतर आता वादात अमृता फडणवीसांची उडी…

News Desk

जेष्ठ आंबेडकर विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांचा खून

News Desk

धावत्या रेल्वेत तरुणांकडून छेडछाड, मायलेकींनी मारली रेल्वेतून उडी

News Desk