HW News Marathi
क्राइम

सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला AU नावाने 44 कॉल; राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई | शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात पुन्हा एकदा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभेत आज (21 डिसेंबर) नियम १९३ अतंर्गत ड्रग्ज संदर्भात लघू चर्चा पार पडली. यावेळी आज राहुल शेवाळेंनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती फोनवर एयू नावाने 44 कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असल्याचा दावा बिहार पोलिसांनी केल्याची माहिती राहुल शेवाळेंनी लोकसभेत दिली आहे.

 

राहुल शेवाळे लोकसभेत आदित्य ठाकरेवर आरोप करताना म्हणाले, “लोकसभेत ड्रग्ज विषयावर चर्चा सुरू आहे. माझ्या आधीच्या भाषणापूर्वीच 4-5 खासदारांनी सुशांतच्या केसचा उल्लेख केला आहे. मी ही सभागहात हाच विषय उपस्थित करत आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयने तपास केला. मात्र, या तिघांचा तपासाची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेली नाही. यामुळे सर्व सामान्य जनतेच्या मनात ही काही प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांचा खुलासा झाला पाहिजे. या प्रकरणातील सुशांत सिंग, दिशा सालियान आणि रिया चक्रवर्ती यांच्यात झालेल्या मेसेज आणि सुशांत सिंगच्या मृत्यूपूर्वी रियाला एयू जे कॉल आले होते. याबाबत बिहार पोलिसांच्या तपासात उल्लेख केला आहे. तर मुंबई पोलिसांनी एयू नाव हे रियाच्या मैत्रिणीचे असल्याचे स्पष्ट केले. परंतु, सुशांत सिंगच्या मृत्यूपूर्वी रियाला ‘एयू’ नंबवरून ४४ फोन कॉल आले.  परंतु, रियाला एयू यांचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असल्याची माहिती बिहार पोलिसांच्या तपासातून बाहेर आली आहे. आणि ही माहिती सीबीआयने सर्व सामान्यापर्यंत पोचलेली नाही. यामुळे सुशांत प्रकरणाची माहिती राज्यातील जनतेला मिळावी म्हणून लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला”, असे ते म्हणाले.

 

 

 

Related posts

चायनीज विक्रेत्याने गिऱ्हाईकाच्या अगावर फेकलं उकळतं तेल video

News Desk

धावत्या ट्रेनमध्ये चोरट्याने बॅग खेचल्याने महिला ट्रेनखाली पडून महिलेचा मृत्यू

News Desk

वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या महिलेवर सामुहिक बलात्कार, कोल्डड्रिंकमधून दारू पाजून केले बलात्कार

News Desk