HW News Marathi
क्राइम

नायर हॉस्पिटलमधील एमआरआय मशिनमध्ये अडकून तरूणाचा मृत्यू

मुंबई – नायर हॉस्पिटलमध्ये एमआरआय मशिनमध्ये अडकून राजेश मरू या ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. हा बहिणीच्या सासूला बघण्यासाठी नायर हॉस्पिटलमध्ये गेला होता. डॉक्टरांनी पेशंटचा एमआरआय करण्यास सांगितले. त्यावेळी राजेश पेशंटसोबत एमआरआय रुममध्ये गेला होता. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी राजेशला एमआरआय रूममध्ये ऑक्सिजनचा सिलेंडर नेण्यास सांगितले.


‘एमआरआय रूममध्ये धातूची वस्तू नेण्यास मनाई असते. पण, एमआरआय मशिन बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे सिलेंडर आत नेण्यास हरकत नाही असे वॉर्डबॉयने राजेशला सांगितले.’ राजेश एमआरआय रूममध्ये सिलेंडर आत घेऊन गेला. पण, रूममध्ये एमआरआय मशिन बंद नसून सुरूच होती. त्यामुळे आत जाताच अचानक सिलेंडरसोबत राजेश एमआरआय मशिनमध्ये ओढला गेला. आणि सिलेंडर व्हॉल्व लीक होऊन ऑक्सिजन बाहेर येऊ लागले.


राजेशचा हात एमआरआय मशिनमध्ये अडकला होता. अखेर कर्मचाऱ्यांच्या मदतीने राजेशला बाहेर काढण्यात यश आले. पण, उपचारा दरम्यान राजेशचा मृत्यू झाला. या घटनेतील दोषीवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत राजेशचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे राजेशच्या नातेवाईकांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नायगाव येथे मटका अड्ड्यावर तर बिलोलीत रेती वाहनांवर कारवाई  

News Desk

पद्मावत पाहण्यास गेलेल्या तरुणीवर बलात्कार

News Desk

पत्नीच्या हत्या प्रकरणी पतीला १० वर्षाची शिक्षा 

News Desk
मुंबई

पोलिसांच्या हेरगिरीविरोधात विखे पाटील यांची राज्यपालांकडे तक्रार

swarit

मुंबई, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी हेरगिरी केल्याच्या प्रकारासंदर्भात राज्यपालांकडे लेखी तक्रार केली आहे.

गेल्या गुरूवारी विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे कर्मचारी अनधिकृतपणे माहिती घेत असल्याचे तसेच पत्रकारांची छायाचित्रे काढत असल्याचे दिसून आले होते. यासंदर्भात विखे पाटील यांनी काल राज्यपालांना पत्र लिहून गृहखात्याविरूद्ध चौकशी व कारवाईचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.

आपल्या पत्रामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी नमूद केले आहे की, हा प्रकार अत्यंत गंभीर आणि लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. पोलिसांनी विधानसभा विरोधी पक्षनेत्याच्या शासकीय निवासस्थानी विनाअनुमती प्रवेश करणे, पत्रकारांची छायाचित्रे काढणे, हा प्रकार अत्यंत संतापजनक, निषेधार्ह आणि घटनात्मक पद असलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या मुलभूत हक्कांचा भंग आहे. या सरकारचा संविधानावर व लोकशाहीवर विश्वास आहे की नाही, असा गंभीर प्रश्न यातून उपस्थित होत असून, ही बाब संविधान,लोकशाही, प्रजासत्ताक ही मूल्य नाकारण्यासारखीच आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना त्याच दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेत्याला अशा लोकशाहीविरोधी प्रकारासंदर्भात राज्यपालांकडे दाद मागावी लागते, हे अत्यंत क्लेषदायक असल्याचेही विखे पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

Related posts

गांधीजींचे छायाचित्र हटवून सरकारने केला राष्ट्रपित्याचा अवमान

News Desk

भाजपचं सरकार गेलं तरच अच्छे दिन: अजित पवार

News Desk

मुंबईतील जेल भरो आंदोलनाला अल्प प्रतिसाद

swarit