HW News Marathi
क्राइम

अब्दुल करिम तेलगीचा मृत्यू

बेंगरुळू(वृत्तसंस्था): कोट्यवधी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करिम तेलगीचा मृत्यू झाला आहे. बंगळुरुमधील एका रुग्णालयात तेलगीवर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून तेलगीची प्रकृती गंभीर होती. त्यामुळेच त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. शरीरातील विविध अवयवांनी (मल्टिपल आॅर्गन फेल्युअर) काम थांबवल्याने तेलगीचा मृत्यू झाला.

बंगळुरुमधील व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तेलगीची प्रकृती अनेक दिवसांपासून गंभीर होती. त्याला वीस वर्षांपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ५६ वर्षांच्या तेलगीवर गेल्या १० दिवसांपासून रुग्णालयात दाखल होता. तेलगीला बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणात तेलगीला २००१ मध्ये अजमेरमधून अटक करण्यात आली होती. रुग्णालयात दाखल करण्याआधी त्याला बंगळुरुतील तुरुंगात ठेवण्यात आले होते.

बनावट मुद्रांक घोटाळ्यातून तेलगीने कोट्यवधींची कमाई केली होती. तेलगीने बोगस ‘स्टॅम्प पेपर’ छापून ते अनेक बँका, विमा कंपन्या आणि शेअर ब्रोकिंग कंपन्यांना विकले होते. तेलगीच्या या प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळ्यात अनेक नेत्यांचा सहभाग असल्याचीही चर्चा झाली होती. या प्रकरणात तेलगीला ३० वर्षांची शिक्षा झाली होती. याशिवाय तेलगीला तब्बल २०२ कोटींचा दंडदेखील ठोठावण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 4 मार्चपर्यंत CBI कोठडी

Aprna

बुलढाणा : शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्यास अटक, उकीरड्यात पुरलेले 42 लाख जप्त

Manasi Devkar

बलात्काराच्या आऱोपींची ठेचून हत्या

swarit