HW News Marathi
क्राइम महाराष्ट्र मुंबई राजकारण

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश

मुंबई : राष्ट्रवादी (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी (Death threat) देणात आली आहे. मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver Oak) येथील घरी अज्ञात व्यक्तीनं फोन करुन पवारांना मुंबईत (Mumbai) येऊन देशी बनावटीच्या पिस्तुलानं (Country-Made Pistol) ठार मारणार असल्याचं म्हटलं आहे. धमकी देणारी व्यक्ती हिंदीत बोलत होती. शरद पवारांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस ऑपरेटरच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीचे (IPC) कलम २९४, ५०६(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पवार यांना धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं आहे.

पवारांच्या निवासस्थानी फोन करुन जीवे मारण्याची धमकी देणारी व्यक्ती वेडसर असल्याची माहिती समोर आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव नारायण सोनी असं आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना धमकी देणारी व्यक्ती बिहारमधील रहिवासी आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तो सतत फोन करून धमक्या देत होता.

शरद पवार यांचा काल (12 डिसेंबर) वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी पवारांना जीवे मारण्याची धमकी आल्याने राज्यात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांनी 2 डिसेंबर रोजी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. ही व्यक्ती शरद पवारांना दिवसाला किमान 100 फोन करत असल्याचा उल्लेख शरद पवार यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री महादेव जानकर यांना दिलासा

News Desk

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होणार

Aprna

मुंबईच्या हवेत वाढते धुरक्याचे प्रमाण

News Desk