HW News Marathi
क्राइम

मीरा भाईंदरच्या काशीमिरामधून अमली पदार्थ तस्कराकडून 19 लाखांचे मेफेड्रोन (MD) जप्त

मुंबई – मीरा भाईंदर परिसरात अमली पदार्थ (Acidic Substance) विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 98 ग्रॅम वजनाचा 19 लाख 60 हजारांचे मेफेड्रोन (MD) जप्त करण्यात आला. फहिम करीम खान (वय 54, रा. नालासोपारा पूर्व, वसई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मीरा भाईंदरच्या (Mira Bhyander) काशीमिरा (Kashimira) भागातील सगनाय मंदिराजवळ (Sagnay Temple) एकजण मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.

 

मिललेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या पथकाने गस्ती दरम्यान फहिमला पकडले. तसेच फहिमची झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडून 19 लाख 60 हजार रुपयांचे 98 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आला. फहीम विरोधात काशीमिरा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ कायद्याचे कलम 8 (क) आणि 22 (क) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक (अमली पदार्थ विरोधी कक्ष) अमर मराठे, सहायक पोलीस निरीक्षक विलास कुठे, पी. डी. टक्के,एस. ए आव्हाड, सुनील कुडवे, अजय यादव आदींनी ही कारवाई केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उमरीमध्ये 9 लाखाच्या गुटख्यासह दोघांना केले अटक 

News Desk

उल्हासनगरच्या धुरू बारवर छापा

News Desk

पोलीस भरतीसाठी उमेदवाराची ‘डोकॅलिटी

News Desk