HW News Marathi
राजकारण

“‘मविआ’ने मला तुरुंगात टाकण्याचा रचला कट”, देवेंद्र फडणवीसांचा धक्कादायक खुलासा

मुंबई | “महाविकास आघाडी सरकारने मला तुरुंगात टाकण्याचा कट रचला होता. हे काम तत्कालीन सीपी संजय पांडे यांना दिले होते”, असा धक्कादायक खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी आज (24 जानेवारी) एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमादरम्यान दिलेल्या मुलाखतीत दिलखुलास गप्पा मारताना सांगितले.

तुमची उद्धव ठाकरेंबरोबर एकद चांगली मैत्री होती. परंतु, गेल्या अडीच वर्षा उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून तुमच्यात कटुता खूप वाढली. राजकीय वैर हे खासगी वैरात रुपांतरीत झाले, असा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना केल्यावर ते म्हणाले, “या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याच्या, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या, मला जेलमध्ये टाकण्याचे टार्गेट, हे याठिकाणी जे सीपी होते, संजय पांडे यांना देण्यात आले होते. अर्थात मी असे काहीच केले नव्हते. ज्याच्यामुळे ते मला तुरुंगात टाकू शकतील. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. पण, कुठल्याही परिस्थित मला अटकवा, मला तुरुंगात टाका, अशा प्रकारचा आदेश महाविकास आघाडी सरकारमधील होते. हे देखील सत्य आहे, आपण पोलीसमधील कोणालाही विचाराल. तर सुद्धा तुम्हाला सांगू शकतील.

शिवसेना आणि वंचित बहुज आघाडीची युतीची निवडणुकीत परिणाम होईल का?, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी युतीचा फार फरक निवडणुकीवर पडणार नाही. भाजपला विरोध म्हणून ही आघाडी झाली आहे. शिवसेना आणि आंबेडकर यांच्या विराचात अंतर आहे. ज्यावेळी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला द्यायचे होते. तेव्हा भाजपने नामांतराला समर्थन केले होते. परंतु, शिवसेनेने त्याला विरोध केला होता.”

 

 

 

 

 

Related posts

बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा! – शंभूराज देसाई

News Desk

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या राहुल गांधींना बॉम्बला बांधून पाठवालया हवे होते !

News Desk

हनुमानाची जात सांगणे पडणार महागात

News Desk