मुंबई | नालासोपाऱ्यातील भांडार आळी भागात राहणाऱ्या वैभव राऊत यांना गुरुवारी दहशतवादी विरोधी पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. राऊत यांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने दहशतवादी विरोधी पथकाच्या मदतीने पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला. राऊत यांच्या घरातून आणि जवळचे असलेल्या दुकानातून बॉम्ब बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. वैभव राऊत हे सनातन या संस्थेचा साधक असल्याचे समजले जाते.
Early morning visuals from Vaibhav Raut's residence in Mumbai's Nala Sopara area from where Anti-Terrorism Squad (ATS) recovered some suspicious material yesterday. Vaibhav Raut detained. More details awaited. #Maharashtra pic.twitter.com/fVeZVQRuAc
— ANI (@ANI) August 10, 2018
दहशतवादी विरोधी पथकाच्या छाप्यात ८ देशी बॉम्बसह स्फोटके बनवण्याचे साहित्य सापडले आहे. बॉम्बशोधक पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्यावर पोलीस आणि दहशतवादी विरोधी पथकाची टीम नजर ठेवून होती. राऊत त्याच्या घरावर छापा टाकत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
Mumbai: Anti-Terrorism Squad (ATS) conducted a raid at the residence of a person named Vaibhav Raut in Nala Sopara area yesterday and recovered some suspicious material from the house and a nearby shop. Vaibhav Raut detained. More details awaited. #Maharashtra pic.twitter.com/UwaI8WOTgb
— ANI (@ANI) August 9, 2018
तर सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी म्हटले की, वैभव राऊत हा सनातनचा साधक नाही. परंतु तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता असल्याचे म्हणाले आहे. सनातनला बदनाम करण्याचा गृहमंत्र्यांचा डाव असल्याचे सांगत सनातन संस्थेवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.