HW News Marathi
क्राइम

धारावीत तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांना अटक

मुंबई । धारावी परिसरात राहणाऱ्या शैलेशकुमार हजारीलाल वैश्य या तरुणावर चार जणांनी शुक्रवारी(९ ऑक्टोबर) प्राणघातक हल्ला केला आहे. शैलेशकुमारला वय (२३) गंभीर दुखापतीसह जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. या विरोधात धारावी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अमृत बसवराज आसनली, अविनाश बसवराज आसनली, जेम्स भास्कर यलागेट्टी आणि स्टॅनली ऊर्फ माता शान्सुकुमार दोडूमणी अशी या आरोपींची नावे आहेत. या चौघांनाही धारावी पोलिसांनी काल (११ ऑक्टोबर) अटक केले आहे. अटकेनंतर या चौघांनाही वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

शैलेशकुमार हा सायन येथील धारावी या विभागात राहतो. शुक्रवारी रात्री दहा वाजता तो त्याचा मित्र शाहरुख शेखसोबत गप्पा मारत होता. त्यावेळी तिथे चारही आरोपी तरुण आले आणि शैलेशकुमारसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत शैलेशला डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या हल्ल्यानंतर ते चौघेही आरोपी तेथून पळून गेले. स्थानिक रहिवाशांनी शैलेशकुमारला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. शैलेशवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ही माहिती मिळताच धारावी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन शैलेशकुमारची तक्रार नोंदवून घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गर्भलिंग निदान करणाऱ्या आरोपींना 14 दिवसांची कोठडी

News Desk

गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळला!

News Desk

चायनीज विक्रेत्याने गिऱ्हाईकाच्या अगावर फेकलं उकळतं तेल video

News Desk