HW News Marathi
क्राइम

पीएनबी बँकेने प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे ‘मी कर्ज फेडू शकत नाही’ – नीरव मोदी

मुंबई – पंजाब नॅशनल बँक घोटळा प्रकरणात पहिल्यांदा नीरव मोदीने मौन सोडले आहे. पीएनबी बँकेला पत्र लिहून ‘बँकेने हे प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे मी कर्ज फेडू शकत नाही’असे या पत्रात म्हटले आहे. पीएनबीचे ५ हजार कोटीपेक्षा कमी कर्ज असल्याचा दावा ही मोदींने पत्रात केला आहे.

“पत्नी आणि मामा मेहुल चोक्सी या दोघांचाही या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना त्यांना यात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मामाचा व्यवसाय हा पूर्णपणे वेगळा आहे. त्या सर्वांना माझ्या बँकेतील व्यवहारांविषयी काहीही माहिती नाही,” असे ही नीरव मोदीने म्हटले आहे.

नीरव मोदीने पीएनबी बँकेला तब्बल ११,५०० कोटीचा चुना लावल्याने ईडीने मोदींच्या मालमत्तेवर छापे टाकण्यात आली आहे. या छप्यात मोदींच्या गितांजली जेम्स या शोरूममधून ५१०० कोटी रुपयांचे हिरे आणि दागिने हस्तगत केले. त्याचबरोबर त्यांच्या बँक खात्यातील ३.९ कोटींच्या ठेवी आणि मुदत ठेवी देखील जप्त केल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी महिला कर्मचऱ्यास पोलीस कोठडी, पाच अटकेत

News Desk

सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला AU नावाने 44 कॉल; राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

Aprna

अपहरणाच्या भीतीने तरुणीची भरधाव रिक्षातून उडी

News Desk
कृषी

“शेती आणि मायबाप”

News Desk

“मायबाप”

“मंगळावरील भारताला अजून भाकरीचा शोध आहे”..आजची खळगी भरली तरी मात्र उद्याचा वेध आहे”….।।।।।

“राब-राब राबतो बाप दीडदमडी पैशासाठी..

अन माय माझी फुंकीते चूल पोटाच्या या खळगीसाठी”।।।।

“थेंब थेंब घामाचा मातीत आटत होता…।।

अन बाप माझा रात्रंदिवस कष्ट करून देश जगवीत होता”।।

“ऐटदार स्त्रियांचा रुबाब मी डोळ्यात भरतो….पण मायेचा फटका पदर मात्र उरात जाळ करतो”….।।।

“लाख मोलाची संस्कृती आमुची आज मातीत मिसळत आहे.”….पण फाटक लुगडं नेसूनही माय माझी लाज राखीत आहे..

…….पण फाटक लुगडं नसूनही मे माझी लाज राखीत आहे……….।।

संदर्भ घेऊन लिहीणं खूप सोप्प असत पण नजरेसमोर घडणार जळजळीत वास्तव ज्यावेळी लेखणीच्या आधारे कागदावर उतरू लागत त्यावेळी त्याच्या प्रभावाची धार लक्षात येते…मीसुद्धा असाच शब्दांचा अधुरा आहे पण जे साठलय ते व्यक्त सुद्धा व्हायला हवं…कारण मनातलं जेंव्हा ओठावर येत तेंव्हा ओठावरच कागदावर उतरविल्याशिवाय पर्याय नसतो….

कष्ट तर सगळेच करतात पण आईवडिलांच्या कष्टाला तोड नाही आजवर आई बाबा या विषयांवर कित्येक लेखकांनी लिहिलं आणि ते वाचनात सुद्धा आलं..पण माझ्या डोळ्यासमोर मात्र जुन्या आठवणीच जळजळीत वास्तव चित्र उभ राहल्याशिवाय राहत नाही…घामाचा प्रत्येक थेंब मातीत मुरवून काळ्या मातीतून हिरवं सोन पिकवणाऱ्या शेतकरी बापाला कष्ट म्हणजे काय हे न सांगितलेलंच बरं….आणि विस्तवावर तापत असणाऱ्या तव्यावर हाताला चटके सोसत भाकरी भाजणाऱ्या आईची संघर्ष गाथा हि तर वेगळीच….आयुष्याला दरिद्रीच खिंडार पडलेलं असतानाही त्यातून मार्गासाठी धडपडणाऱ्या शेतकरी बापाला मी आजही माझ्या डोळ्यात साठवतोय…..साडीचोळीसाठी पैसे साठवून ठेवलेले असताना शाळेच्या फिसाठि कसलीही पर्वा न करता रुमालात बांधून ठेवलेले पैसे बिनघोरपणे काढून देताना आईचा हात आजही डोळ्यासमोर उभा राहतोय…अभ्यास महत्वाचा आहे आणि तो केलाच पाहिजे म्हणून कानाला धरून खेळाच्या मैदानातून घरापर्यंत आणणाऱ्या आजीचा चेहरा आजही डोळ्यासमोर नकळत तरळून जातोय…

रोजच्या धाकधुकीच्या जीवनात न विसरता येणाऱ्या या आयुष्यातल्या सगळ्यात अनमोल गोष्टी..ज्या संघर्ष करण्याची उमेद देऊन जातात….डोक्याला फाटका टॉवेल,पाचवीला पुजलेल ठिगळं पडलेलं बनियान आणि हाफ चड्डीवर उभा संसार न डगमगता ज्या शेतकरी बापानं आजवर सांभाळला त्या बापाचा अभिमान वाटल्याशिवाय तरी कसा राहील…ज्या माईने हातात खुरपं घेऊन शेतातल्या रानाची भांगलणी तर केलीच पण त्याबरोबर आमच्या मनातल्या वाईट विचारांचीसुद्धा आजवर भांगलनी केली तिचाही गौरव करावा वाटतो….लिहितोय यासाठी कारण बऱ्याच दिवसानंतर एक कविता लक्षात आली…याच कवितेच्या माध्यमातून मी अक्ख्या कॉलेजसमोर मायबापांचा संघर्ष मांडला होता ती कविता आज पुन्हा एकदा ऐकवावीशी वाटतीय… आयुष्यभर संघर्षाच्या लाटेवर स्थिर राहून आम्हाला ज्यांनी संघर्षाशी लढण्याची उमेद दिली त्या प्रत्येक आईवडिलांना समर्पित…

-कृष्णा सोनारवाडकर

Related posts

GST लागू झाल्याने 1 जुलै पासून सायनिक खताच्या किंमती कमी       

News Desk

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत योजनेसाठी विविध घटकांनी 31 जुलै पर्यंत नोंदणी करा – कृषी विभागाचे आवाहन

News Desk

केन हार्व्हेस्टरला मोठी मागणी

News Desk