HW News Marathi
क्राइम

मेजर गोगोई हॉटेल प्रकरणात दोषी, न्यायालयाकडून कारवाईचे आदेश

नवी दिल्ली | मेजर लितुल गोगोई यांनी श्रीनगरमधील एका हॉटेलबाहेर अल्पवयीन मुलगीसोबत असताना अटक करण्यात आले होते. कर्तव्यात असताना गोगोई यांनी त्यांना नेमून दिलेल्या हद्दीच्या बाहेर असल्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे.

गोगोई यांनी २३ मे रोजी श्रीनगरमधील हॉटेल ग्रँड ममताच्या जाण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी हॉटेलमधील व्यवस्थापनाशी वाद झाला. यानंतर परिस्थिती हाता बाहेर जात असल्याचे लक्ष्यात येताच हॉटेलमधील व्यवस्थापकांनी पोलिसांना बोलवण्यात आले होते. पोलीस घटनास्थळी पोहोचून गोगोई आणि अल्पवयीन मुलगी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पोलीस चौकशीत दरम्यान समजले की, गोगोई यांच्यासोबत असणारी अल्पवयीन मुलगी ही बडगाममधील राहणारी आहे. यानंतर आयजीपींनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश श्रीनगर विभागाचे एसपी सज्जाद शाह यांना दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

News Desk

अल्पवयीव विद्यार्थिंनीचा पाठलाग करून विनयभंग

News Desk

नवे पुरावे गंभीर, आर्यन खान ड्रग प्रकरणाची राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावीः नाना पटोले

News Desk
देश / विदेश

गुगलकडून सर डॉन ब्रॅडमन यांना डुडलद्वारे आदरांजली

Gauri Tilekar

मुंबई | क्रिकेटच्या जगातील विक्रमी फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांची आज ११०वी जयंती आहे. ब्रॅडमन यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्त्व करताना ९९.९४ च्या सरासरीने फलंदाजी करणाऱ्या या क्रिकेटरने अनेक सर्वोच्च विक्रमांवर आपले नाव कोरले.

२७ ऑगस्ट १९०८ रोजी ऑस्ट्रेलियातील कुंटमुद्रा येथे सर डॉन ब्रॅडमन यांचा जन्म झाला. सर डॉन ब्रॅडमन यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ३१ द्विशतके ठोकली. असा विक्रम करणे आजपर्यंत कोणत्याही फलंदाजाला शक्य झालेले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये ९९.९६ च्या सरासरीने धावा करण्याचा त्यांचा विक्रम आजपर्यंत कोणीही फलंदाज मोडीत काढू शकला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके फटकावणारे सर डॉन ब्रॅडमन पहिले फलंदाज ठरले.

क्रिकेटव्यतिरिक्त टेनिस, स्क्वाश, गोल्फ, रग्बी लीग असे खेळही डॉन ब्रॅडमन त्यांना प्रिय होते. सर ब्रॅडमन यांना क्रिकेटसोबतच संगीताचीही प्रचंड आवड होती. तरीही क्रिकेटच्या जगतात ते सर्वाधिक रमले आणि त्यांच्या नावाचा वेगळा ठसा त्यांनी उमटवला. आजही जगाच्या कानाकोपऱ्यात सर डॉन ब्रॅडमन यांचे असंख्य चाहते आहेत.

Related posts

मुंबईत पुन्हा पेट्रोल १८ तर डिझेल ३१ पैशांनी महाग

Gauri Tilekar

CBSE बोर्डाची १०वीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच होणार  

News Desk

लोकसभेत विरोधकांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वपूर्ण !

News Desk