HW News Marathi
क्राइम महाराष्ट्र

बुलढाणा : शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्यास अटक, उकीरड्यात पुरलेले 42 लाख जप्त

उस्मानाबाद | प्रतिनिधी, उदय साबळे पाटील

ज्यादा दराने धान्य खरेदी करतो, असे आमिष दाखवून शेकडो शेतकऱ्यांचे 3 कोटी 41 लाख 42 हजार रुपयांचे धान्य खरेदी करून शेतकऱ्यांचे पैसे न देता फरार झालेला मुख्य आरोपी संतोष रानमोडे यास बुलढाणा पोलीस पथकाने परंडा पोलिसांच्या मदतीने बावची तालुका परंडा येथून अटक केले आहे. तसेच त्याने उकिरड्यात पुरलेली तब्बल 42 लाख 11 हजार रुपयांची रोकड व कार गाडी जप्त करण्यात आली आहे

बुलढाणा पोलीस व सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की मुख्य आरोपी संतोष बाबुराव रानमोडे हा परंडा तालुक्यातील कौडगाव येथील मूळ रहिवासी आहे. शेतकरी फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष रानमोडे याचे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे पवित्रा ट्रेडिंग कंपनी नावाने धान्य खरेदी आडत दुकान होते. आरोपी संतोष रानमोडे यांनी अशोक समाधान मस्के, निलेश आत्माराम सावळे यांच्या मदतीने चिखली परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना जादा दराने धान्य खरेदी करतो असे आमिष दाखवून शेतमाल खरेदी केला. तसेच तुमच्या खात्यावर ऑनलाईन पैसे पाठवतो अशी थाप शेतकऱ्यांना मारली. मात्र, शेतकऱ्यांना पैसे न देता घेतलेला माल विकून तिघे आरोपी फरार झाले होते.

शेतमाल विक्री केलेले पैसे खात्यावर न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येताच पवित्रा ट्रेनिंग कंपनीच्या धान्य खरेदी आडत दुकानदाराविरोधात शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी सुनील लक्ष्मणराव मोडेकर यांनी चिखली पोलिसात फिर्याद दिल्याने मुख्य आरोपी संतोष रानमोडे, अशोक समाधान मस्के, निलेश सावळे यांच्यावर फसवणुकीसह विविध कलमानुसार चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी विरुद्ध चिखली पोलिसांत शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली तर फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

आरोपी परंडा तालुक्यातील असल्याची माहिती बुलढाणा पोलिसांना मिळाल्याने बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया अप्पर पोलीस अधीक्षक श्रवणदत्त उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अशोक जायभाये, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद डोईफोडे, पोहेकॉ रामेश्वर मुंडे, पो. हे. कॉ. सरदार बेग यांचे पथक मुख्य आरोपी संतोष रानमोडे याच्या तपासासाठी परंडा येथे दाखल झाले होते.

परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे, पो. ना. बळीराम शिंदे, पो. ना. पायल पायाळ, पोलीस अंमलदार मनोज यादव यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन दिनांक 14 जुलै रोजी परंडा तालुक्यातील बावची येथून मुख्य आरोपी संतोष रानमोडे यास त्याच्या बावची येथील नातेवाईकाच्या घरातून अटक केली आहे. तसेच उकिरड्यात पुरून ठेवलेले 42 लाख 11 हजार 920 रुपये व लपवून ठेवलेली कार जप्त करण्यात आली आहे. आरोपीस घेऊन चिखली पोलीस 14 जुलै रोजी चिखलीकडे रवाना झाले आहेत, तर घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक! परळीत वृद्ध बहिण-भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

News Desk

भाजप मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी खेळतेय, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

News Desk

मुंबई महानगर प्रदेशात तृतीयपंथीयांसाठी घरे; विशेष योजना तयार करा! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna