HW News Marathi
क्राइम

मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक

मुंबई | मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आव्हाडांनी ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमधील थिएटरमध्ये  रविवारी (7 नोव्हेंबर) रोजी रात्री आव्हाडांनी ‘ हर हर महादेव’ (Har Har Mahadev)या सिनेमाचा शो बंद केला होता. या सिनेमाचा शो बंद करताना आव्हाडांनी प्रक्षकांना बाहेर जाण्याचे आवाहन केले. यावेळी आव्हाडांनी राडा केला.

या प्रकरणी आव्हाडांसह त्यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी परीक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आव्हाडांवर कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार, आव्हाडांवर पोलिसांनी जामीनपात्र गुन्हे होते. आनंतर आजून काही कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकरणातील अटकेसंदर्भात आव्हाडांनी तीन ट्वीट करत त्यांची भूमिका मांडली आहे. आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल.” आव्हाडांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले, “हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेले नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे बबनराव थोरातांच्या ‘त्या’ चिथावणीखोर वक्तव्यामुळे उदय सामंत यांच्या गाडीवर झाला हल्ला

Aprna

व्हीआयपी नवी आय पी मोबाईल नंबर च्या नावाखाली लोकांची फसवणूक करणा-या रँकेटचा पर्दाफाश

News Desk

बिलोलीत अवैध दारू दुकानावर छापा , 29 जणांवर कारवाई

News Desk