HW News Marathi
क्राइम

एटीएसकडून ताब्यात घेण्यात आलेल्या ९ जणांपैकी १ जण अल्पवयीन

मुंबई | इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून मंगळवारी (२२ जानेवारी) मुंब्र्यातील ४ जणांना तर औरंगाबादमधून ५ जणांना एटीएसकडून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, ९ जणांपैकी १ जण हा अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्वजण गेल्या काही आठवड्यांपासून एटीएसच्या रडारवर होते. मुंबईत अथवा महाराष्ट्रात काही घातपाती कृत्य होण्याची शक्यता एटीएसला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

एटीएसकडून ताब्यात घेण्यात आलेल्या या ९ जणांचे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंध असल्याची माहिती मिळत आहे. सलमान खान, फहाद शाह, झमेन कुटेपडी, मोहसीन खान, मोहम्मद मझर शेख, ताकी खान, सरफराज अहमद, झाहीद शेख आणि एक अल्पवयीन मुलगा या ९ जणांना एटीएसकडून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासातून या ९ जणांकडे काही रसायने, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स, चाकू, मोबाईल्स आणि सिम कार्ड्स हस्तगत करण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरबजित सिंगच्या भावाचा दलबीर कौरवर थेट आरोप

News Desk

आमदार हर्षवर्धन जाधव यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रूपये दंड

News Desk

संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

Chetan Kirdat