HW News Marathi
क्राइम

4 बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी सेंटरवर छापा; 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई | बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी (illegal online lottery centers) व्यवसाय चालवणाऱ्या 4 सेंटरवर गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने छापा टाकून मालक, चालक यांच्यासह 9 गिऱ्हाईकांना अटक केली आहे. लॉटरी सेंटर चालवण्याकरीता वापरण्यात आलेले 5 मोबाईल, 4 सी.पी.यु (CPU), 5 मॉनिटर, प्रिंन्टर, की बोर्ड, राउटर, ऑनलाईन लॉटरी निकालाचे चार्ट याच्यासह 67 हजार 810 रुपये जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर रेल्वे स्टेशन जवळ मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी व्यावसाय सुरू होता. स्वत:च्या फायद्यासाठी कोणतेही कायदेशीर परवाने न घेता सॉफ्टवेअर द्वारे अज्ञात ठिकाणी सर्वर (Server) तयार करून प्रत्येक १५ मिनीटांनी लॉटरीचे निकाल इंटरनेटव्दारे प्रसारित केले जात होते. ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून जुगार खेळवला जात असल्याची माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने घाटकोपर रेल्वे स्टेशन जवळील Canasta (स्कील गेम), Balaji Win Game, G-C ऑनलाईन लॉटरी आणि PLAY 2 Win या 4 सेंटरवर छापा टाकून 1 मालक, 6 चालक यांच्यासह 9 गिऱ्हाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर 3 लॉटरी सेंटर मालकांचा शोध सुरू आहे.

ताब्यात घेतलेले 16 आरोपी कोणतेही कायदेशीर परवाने न घेता ऑनलाईन लॉटरी सेंटर चालवताना व खेळताना आढळून आल्याने त्यांच्या विरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंदक अधिनियमाचे कलम 4(A), 5 सह लॉटरी रेगुलेशन्स अधिनियमाचे कलम 4(1), 7(3), 8 आणि 9 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे युनिट 7 करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिमी खटल्याचा निकाल : जळगावच्या दोघांना सक्तमजुरी

News Desk

अलिगड पोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर

swarit

माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात हजर

News Desk