HW News Marathi
क्राइम

खाजगी महिला गुप्तहेर रजनी पंडितला अटक

मुंबई – बेकायदा कॉल डिटेल्स रेकॉर्डस (सीडीआर)ची विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये ठाण्याच्या गुन्हे शाखेने भारतातील पहिली महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित (५५) यांना अटक केली आहे. यांनी सीडीआर विकणाऱ्या टोळीकडून बेकायदेशीपणे सीडीआर विकत घेतल्या प्ररकरणी अटक केले आहे. पंडित या गेल्या २७ वर्षापासून गुप्तहेर एजन्सी चालवित आहेत. यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलिसांनी शुक्रवारी दादर येथून रजनी पंडित यांच्यासह अजून दोन गुप्तहेरांनाही अटक करण्यात आले. सीडीआर विक्रीच्या माध्यमातून आर्थिक कमाई करणाऱ्या माकेश पांडियन, प्रशांत पालेकर, जिगर मकवाना आणि प्रतीक मोहपाल या खासगी गुप्तहेरांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

रजनी यांनी प्रत्येकी १२ हजार रुपयांना पाच सीडीआर विकत घेतल्या आहेत. या सीडीआर त्यांनी कशासाठी वापर केला, याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस नितीन ठाकरे यांनी दिली आहे. गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री संतोष पंडागळे (३८) आणि प्रशांत सोनावणे (३४) या दोघांना अटक केले आहे. ठाणे न्यायालयाने दोघांनाही आठ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी आरोपींजवळून १७७ मोबाइलधारकांचे सीडीआर हस्तगत केले आहेत. हे सीडीआर कोणाचे आहेत, त्याचा वापर कशासाठी केला जात होता आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे ते कुणाला पुरविण्यात आले. याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) अभिषेक त्रिमुखे यांनी दिले .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना पदाधिकारच्या कारने शाळकरी मुलींनी चिरडले

News Desk

खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी उपचारा दरम्यान रुग्णालयातून पळाला

News Desk

आमदार वर्षा गायकवाड यांच्या मोबाईलवर अश्लील मेसेज

News Desk