HW News Marathi
क्राइम

शिवसेना पदाधिकारच्या कारने शाळकरी मुलींनी चिरडले

बारामती: शिवसेनेच्या बारामती शहरप्रमुखाच्या भरधाव कारने दोन शाळकरी मुलींना चिरडले. यात दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर एक मुलगी जखमी झाली आहे. या घटनेनंतर शिवसेना शहरप्रमुख फरार झाला. संतप्त ग्रामस्थांनी त्याची स्कॉर्पिओ गाडी जाळून टाकली. शहरप्रमुख पप्पू माने सकाळी कारने मोरगावच्या दिशेने चालला होता. बारामती-मोरगाव रस्त्यावर सकाळी साडेसातच्या सुमारास समीक्षा मनोज वीटकर (वय १३), दिव्या ज्ञानेश्वर पवार (वय १४), पायल लष्कर या शाळेत जात होत्या. त्याचवेळी मानेच्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. यात समीक्षा आणि दिव्याचा जागीच मृत्यू झाला. तर पायल जखमी झाली आहे. अपघातानंतर माने कार तिथेच सोडून पसार झाला. या अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. माने पसार झाल्याचे समजताच त्यांनी कारची तोडफोड केली आणि पेटवून दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

6 दहशतवादी अटकेत; मुंबईत राहणारा दहशतवादी नेमका कोण?

News Desk

चर्चगेट रेल्वे स्थानकावर मुलीचा विनयभंग,आरोपी सीसीटीव्हीत कैद

News Desk

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीनेवर बलात्कार

News Desk