HW News Marathi
क्राइम

रशियन महिलेची भर रस्त्यात छेडछाड

बोरिवली परीसरात रशियन महिलेशी छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे. महिला रिक्षातून उतरून घरी जात असताना. रस्त्यावर असणा-या काही लोकांनी महिलेशी छेडछाड केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल कारून पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितूनुसार, बोरीवली भागात राहणारी एक रशियन महिला 1 नोव्हेंबरच्या रात्री दहा वाजता रिक्षेने तिच्या घरी जात होती. घराजवळ रिक्षातून उतरून घरी पायी जात असताना. रस्त्यात असणाऱ्या एका व्यक्तीने तिच्याकडे पाहून अश्लील शब्द वापरले. त्या व्यक्तीच्या शब्दांकडे दुर्लक्ष करत ती पुढे चालत होती. तेव्हा आरोपीने त्या महिलेला पकडून बळजबरी करायला सुरूवात केली. पीडिताने आरडाओरडा करायला सुरूवात केल्यावर आजूबाजूची लोक तिथे आली. त्यांनी आरोपींना पडकण्याचा प्रयत्न केला.पण आरोपींने पळ काढला. घटनेच्या तीन दिवसांनंतर पीडित मुलीने एमएचबी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून घटनास्थळाजवळ असणाऱ्या सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रद्धा वालकरच्या पत्राची महाराष्ट्र पोलिसांनी दखल का घेतली नाही? आशिष शेलारांचा सवाल

Aprna

मुलावर अॅसिड हल्ला

News Desk

तरूणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणा-या व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल

News Desk