HW News Marathi
क्राइम

तासगावमधील सराफासह चौघे तडीपार!आणखी रडारवर

सांगली | संजयनगर परिसरात चेन हिसकावून घेण्यासारखे गंभीर गुन्हे केल्याप्रकरणी तासगावमधील खेराडकर सराफासह चौघांवर आज तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

टोळीचा म्होरक्‍या रौनक उर्फ विश्‍वजीत मुकुंद खेराडकर (२०, खेराडकर वाडा, तासगाव), अनिल शिवाजी बाबर (३१, खोतनगर, मिरज), अभि उर्फ रोहीत तानाजी चव्हाण (२१, सरस्वती गल्ली, तासगाव) आणि कपील उर्फ प्रफुल्ल शशिकांत होवाळे (१९, दत्त मळा गल्ली, तासगाव) या चौघांना सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातून वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले आहे.

एखाद्या सराफाला तडीपार करण्याचा हा दणका या व्यवसायातील गुन्हेगारांसाठी इशारा मानला जात आहे. सोनसाखळी चोरांचा म्होरक्‍या रौनक याचा तासगावमध्ये सराफी व्यवसाय आहे. त्याचे साथीदारही तासगावचे आहेत. या टोळीने २०१७ पासून संजयनगर परिसरात चोरीसह गंभीर गुन्हे केल्याचे उघडकीस आले होते.

दरम्यानच्या काळात चौघेही कारागृहात होते. जामिनावर बाहेर आल्यानंतरही त्यांचा हा उद्योग सुरुच होता. चोरीचे सोने घेणे, स्वतः चेन स्नॅचिंग करणे व साथीदारांकडून चोरी करून घेणे यात रौनकचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वेळोवेळी सहभाग होता. या टोळीने संजयनगर परिसरात धुमाकूळ घालत दहशत निर्माण केली होती. आज अधिक्षक सुहैल शर्मा यांनी तडीपारीचा दणका दिला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सिद्धापापा रूपनगर, विशाल भिसे यांचा कारवाईत सहभाग होता.

आणखी गुन्हेगार रडारवर

पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी उत्सवांपूर्वी गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या महिन्यात इस्लामपूर येथील शिवसेनेच्या नेत्याच्या भावासह १७ जणांना मटका आणि जुगार याप्रकरणी तडीपार केले आहे. राजकीय लागेबांधे असलेले अनेक जण रडारवर आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | पोलीस, माध्यमांद्वारे चौकशी करणे ही योग्य पद्धत नाही !

News Desk

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

Aprna

चेष्टा जीवावर बेतली, रागात कु-हाडीने एकाची हत्या

News Desk