HW News Marathi
क्राइम

अल्पवयीन मुलीला अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल होताच आरोपी अटक

मुंबई कुर्ला परिसरातील एका अल्पवयीन मुलीने छेडछाडल करणा-या तरूणाला विरोध केल्याने आरोपी इम्रान शेखने हातातील लोखंडी सळईने बेदम मारहान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटना 17 ऑक्टोंबर रोजी घडली आहे. सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकऱणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी इम्रान शेखला अटक केली आहे.

अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रीनीसोबत मंगळवारी सायंकाळी सात वाजता चेंबुर येथील आदर्शनगरमध्ये ट्यूशन क्लासला जात होती. यावेळी इम्रान शेखने तिला आडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने विरोध केल्याने इम्राम शेखने लोखंडी सळईने बेदम मारहान करत होता. यावेळी लोकांनी तिला सोडवण्या ऐवजी बघ्यांची भुमीका घेतली. आरोपी मारहान करून तेथून फरार होण्यात यशस्वी झाला. सर्व प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झालेली विडीओ क्लिप वायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोघांच्या डोळ्यात मिरची,अं,गावर पेट्रोल टाकून दरोडेखोरांनी १ लाख २३ हजार रुपये लुटले

News Desk

हार्दिक पांड्या, केएल राहुलसह करण जोहरवर जोधपूरमध्ये गुन्हा दाखल

News Desk

सिमेंट गोदामावरील दरोडा फसला आणि पकडला गेला; कसं पकडलं पोलिसांनी?

Chetan Kirdat