HW News Marathi
क्राइम

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडून देणाऱ्यास NIA कडून 25 लाखांचे बक्षीस जाहीर

मुंबई | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ( Dawood Ibrahim) यांना पकडून देणाऱ्याला राष्ट्रीय तपास यंत्रणे (NIA) बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. एनआयएने (NIA) दाऊदची माहिती देणाऱ्याला 25 लाख रुपयाचे बक्षीस देणार असून दाऊदचा सहकारी आणि विश्वासून समजला जाणाऱ्या छोटा शकीला 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्याचबरोबर अनीस, चिकना आणि मेननला पकडून देणाऱ्याल प्रत्येकी १५ लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, 1993 साली मुंबईत साखळी बॉम्ब स्फोट, शस्त्रास्त्रांची तस्करी, अमली पदार्थांची तस्कारी, खोट्या नोटा, दहशतवादी हल्ले आदी गुन्ह्यांमध्ये दाऊतचा हात असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दाऊद हा डी-कंपनी चालवितो असून दाऊदला 2003 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक दहशतवादी जाहीर केला. तर भारताविरोधात दहशतवाद प्रतिबंध कायद्यानुसार त्यांच्या गुन्हा दाखल करले आहे, अशी माहिती एनआयने दिली आहे.

भारतमधील मोस्ट वॉटेंड आरोपींच्या यादी दाऊदचा समावेश आहे. या यादीत लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हफीस सईद, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझर, हिजबुल मुजाहिद्दीनचा संस्थापक सैयद सलाहुद्दीन यांचा देखील समावेश आहे. तसेच दाऊद हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीने भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी काम करत असल्याचे समजते.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१७ दिवसांनंतर आज जामिनावर आर्यन खान येणार कोठडीतून बाहेर?

News Desk

अंबानींच्या कुटुंबीयाना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात

Aprna

अंबरनाथमध्ये सिमेंटचा बेंच पडून चिमुकलीचा मृत्यू ,

News Desk